विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इच्छुकांच्या संख्येत मोठी वाढ होत असून उमेदवारी मिळविण्यासाठी अनेक इच्छुक उमेदवार पक्षश्रेष्ठींची भेट घेत आहेत.
याच पार्श्वभूमीवर बेळगाव ग्रामीण मतदार संघासाठी, तालुक्यातील हिंडलगा कार्यक्षेत्रातील ग्रामपंचायतीचे अध्यक्ष नागेश मन्नोळकर यांनीही आज मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आहे.
ग्रामीण मतदार संघासाठी भाजपकडून उमेदवारी मिळविण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत. याचवेळी आमदार रमेश जारकीहोळी यांनीही मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन चर्चा केली आहे.
नागेश हे माजी मंत्री गोकाकचे आमदार रमेश जारकीहोळी यांचे कट्टर समर्थक मानले जातात त्यांच्या माध्यमातूनच त्यांनी बेळगाव ग्रामीण साठीच्या उमेदवारीसाठी प्रयत्न चालवले आहेत.
हिंडलगा ग्राम पंचायतीच्या माध्यमातून त्यांनी अनेक वर्षे केलेली कामे वाढवलेला जनसंपर्क या माध्यमातून त्यांनी आपलीही दावेदारी सांगितली आहे.ग्रामीण मतदार संघ हा बहुल मराठा मतदार असलेला मतदार संघ आहे त्यासाठी भाजप कडून देखील मराठा समाजाला प्रतिनिधित्व मिळावे यासाठी मननोळकर हे उमेदवारी मिळवण्यासाठी प्रयत्नशील असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.