बाजारपेठेतील आठ दिवसांपूर्वी असलेला भाताचा दर अचानक घसरल्यामुळे आधीच अतिवृष्टी व मावा रोगाने मेटाकुटीस आलेल्या शेतकऱ्यांच्या चिंतेमध्ये आता आणखीनच वाढ झाली आहे. त्याचप्रमाणे सरकारने ताबडतोब भात खरेदी केंद्र सुरू करण्याची मागणी केली जात आहे.
आधीच अतिवृष्टी व मावा रोगाने मेटाकुटीस शेतकरी आलाय त्यात पेरणी गेली, लावणी करण्यासाठी आपल्या घरातील सोनं तारण ठेवून कर्ज काढले. मात्र त्यानंतर पिकाला मावा रोगाची लागण झाल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली.
आता असलेले भातपीक मळणी करुन विकून सोनं सोडवाव किंवा होईल तेवढ कर्ज फेडून आणि आपल्या पोटाची खळगी भरण्यासाठी ठेऊन उरलेलं भात विकाव म्हटलं तर आता भाताचा दर घसरला आहे. आठ दिवसाआधी बासमती भात 3200 रु. क्विंटल तर इंद्रायणीचा दर 2000 रु. क्विंटल होता तो आज 1600/1800 रु. क्विंटल असून पुढे आणखी किती कमी होईल सांगता येत नाही.
दुसरी गोष्ट विभक्त पध्दतीमूळे शेतकऱ्यांच्या घरी भातपीकं ठेवायला जागा नसल्याने शेतकऱ्यांना मोठ्या अडचणीनां सामोरे जाव लागत आहे. त्यामुळे शेतकरी आणखीनच चिंतित झाले आहेत.
तेंव्हा सरकारने यावर ताबडतोब विचार करुन भात खरेदी केंद्र उभी करुन शेतकऱ्यांच्या पीकांना त्यांचा घामाचे चिज मीळवून दिल्यास सोईचे होईल असे मत व्यक्त होत आहे. अन्यथा हे सरकार शेतकऱ्यांना तारणारे नसून मारणारे ठरणार असल्याचे बोलले जात आहे.