Tuesday, April 16, 2024

/

शताब्दी वर्षानिमित्त डीपी हायस्कूलची ॲल्युमिनी मीट

 belgaum

यंदाचे 2022 हे वर्ष शहरातील टिळकवाडी येथील डिव्हाईन प्रॉव्हिडन्स कॉन्व्हेंट हायस्कूलचे शताब्दी वर्ष आहे. गेली 100 वर्षे या शाळेने समाजाला व्यापक शिक्षण देण्याचे विशेष करून मुलींना ज्ञानदान करण्याचे कार्य अवरितपणे सुरू ठेवले आहे.

शाळेच्या शताब्दी वर्षाच्या खास सोहळ्यासाठी डिव्हाईन प्रॉव्हिडन्सच्या सर्व माजी विद्यार्थिनी एकत्रित आल्या असून त्यांनी ग्लोबल डिव्हाइनिट्स ऑफ बेळगावी (जीडीबी) या नावाने माजी विद्यार्थी संघटना स्थापन केली आहे. या संघटनेतर्फे येत्या रविवार दि. 18 डिसेंबर 2022 रोजी शाळेच्या आवारात माजी विद्यार्थी पुनर्भेट मेळावा (ॲल्युमिनी मीट) आयोजित केला जाणार आहे.

सर्व माजी विद्यार्थ्यांसाठी हा जीवनातील अविस्मरणीय क्षण असणार आहे. याप्रसंगी बालपणीच्या शाळेतील आठवणी जागवल्या जाणार आहेत, शिक्षक वृंदाचा सत्कार करून त्यांच्या विषयीचा आदर प्रकट केला जाणार आहे. त्याचप्रमाणे अन्य उपक्रम राबविले जाणार असून सर्वात शेवटी उपस्थितांना डीजेचा अनुभव घेता येणार आहे.Dp school

 belgaum

तरी डिव्हाईन प्रॉव्हिडन्स हायस्कूलच्या माजी विद्यार्थ्यांनी याची नोंद घेऊन शताब्दी वर्षाच्या भव्य सोहळ्यासाठी लवकरात लवकर नाव नोंदणी करावी. नावे नोंदविण्याची अंतिम तारीख 18 नोव्हेंबर 2022 ही आहे.

याकरिता आपल्या बॅचच्या प्रतिनिधींशी किंवा शाळेशी अथवा [email protected] या ठिकाणी मेल पाठवावा असे आवाहन करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.