पायाला झालेल दुखणं सहन न झाल्यामुळे एका युवकाने स्वतःचा पाय स्वतःच कोयताने तोडून घेतल्याची घटना बैलहोंगल (जि. बेळगाव) तालुक्यातील नावलगट्टी गावात घडली आहे.
नवलगट्टी येथील राजू यरगप्पा उदगिरी (वय 24) असे या जखमी युवकाचे नांव असून घरात कुणी नसल्याचे पाहून त्याने स्वतःचा पाय स्वतःच तोडून घेतला आहे.
ऊस कापणीच्या कोयत्याने त्याने आपला पाय तोडला. सदर प्रकार निदर्शनास येताच ग्रामस्थांनी गंभीर जखमी राजूला जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.
राजू उदगिरी याचा एक पाय रोगामुळे निष्क्रिय झाला होता. त्यामुळे तो मानसिक दृष्ट्या खचला होता. अखेर पायाचे दुखणे असह्य झाल्याने त्यातून मुक्तता मिळवण्यासाठी त्याने स्वतःचा पाय स्वतःच तोडून टाकला. सध्या जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी राजूचा तुटलेला पाय पुन्हा जोडण्याचा प्रयत्न चालविला आहे.