वाहन चोरीच्या तक्रारीसाठी आता ई -एफआयआर सुविधा
आपले वाहन चोरीला गेल्यास नागरिकांना आता ई -एफआयआर द्वारे घरबसल्या जागेवरूनच पोलिसात तक्रार नोंदविता येणार आहे. कर्नाटक राज्य पोलीस दलाने नागरिकांचा त्रास वाचविण्यासाठी ऑनलाइन वेब पोर्टल माध्यमातून ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे.
बेळगाव शहर पोलीस आयुक्तांनी शहरवासीयांशी कर्नाटक राज्य पोलीस दलाचे हे ऑनलाईन वेब पोर्टल शेअर केले आहे. ई -एफआयआर सुविधेमुळे सुविधेमुळे यापुढे नागरिकांना वाहन चोरीची तक्रार नोंदविण्यासाठी पोलीस ठाण्यात जाण्याची गरज भासणार नाही. ई -एफआयआरमुळे नागरिकांना वाहन चोरी अनुषंगाने जवळच्या पोलीस ठाण्यातून आवश्यक मदत मिळणार आहे. ई -एफआयआर रजिस्ट्रेशन करण्यासाठी प्रथम कर्नाटक राज्य पोलिसांच्या सिटीजन सेंट्रिक पोर्टलच्या https://policeseva.ksp.gov.in/
या ठिकाणी अकाउंट तयार करा अथवा असेल तर त्यावर लॉगइन करा. तेथे ई -एफआयआर रजिस्ट्रेशन (फक्त चोरीची वाहने) या ऑप्शन अर्थात पर्यायावर क्लिक करा.
क्लिक करताच नोंदणीसाठी नवे एफआयआर पृष्ठ येईल. त्या पृष्ठावर विचारण्यात आलेली आधार क्रमांक, डीओबी, वडिलांचे नांव, मोबाईल नांव वगैरे तपशील भरा. त्यानंतर अकारांस पर्यायामध्ये वाहन केेंव्हा चोरीस गेले ते नमूद करा. त्यानंतर वाहनाचा रजिस्ट्रेशन नंबर एंटर करा. ज्याद्वारे वाहन डाटाबेसमधून संपूर्ण माहिती गोळा केली जाईल. कंप्लेंट मेनू अंतर्गत आरसी आणि इन्शुरन्स अपलोड करता येते आणि त्याचे प्रमाणीकरण आधार क्रमांक व ओटीपीद्वारे करता येते. यावेळी स्क्रीनवर तात्पुरता विनंती क्रमांक दाखविला जाईल. त्याचप्रमाणे ई -एफआयआर द्वारे संबंधित पोलीस ठाण्यात तक्रार नोंद झाल्याचा संदेशही दिसेल. सिटीजन सेंट्रिक पोर्टलवरील एफआयआरसाठी ई -स्वाक्षरी करिता तुम्हाला एसएमएस आल्यानंतर त्याची प्रत डाऊनलोड करा किंवा मदतीसाठी 080-22943071/22943781 अथवा [email protected] लेखी कळवा. दाखल केलेला एफआयआर शोधण्यासाठी https://ksp.karnataka.gov.in/firsearch/en या लिंकचा वापर करावा.