अलारवाड क्रॉस कडून जुने बेळगाव जाणाऱ्या इनोव्हाच्या चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने झालेल्या विचित्र अपघातात चौघे जण जखमी झाल्याची घटना मार्ग जुनेबेळगाव येडियुरप्पा मार्ग वळणावर घडली आहे.
रविवारी पहाटे पाचच्या दरम्यान हा अपघात घडला असून चौघा जखमीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
घटनास्थळा वरून मिळालेल्या माहितीनुसार बेळळारी
नाल्या कडून जुन्या बेळगावकडे येणाऱ्या इनोव्हा चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने गाडीने इलेक्ट्रिक पोल आणि गटातील जोराची धडक दिली गाडी इतक्या वेगात होती इनोव्हा दोन पलटी होऊन रस्त्या शेजारील भात पीक असलेल्या शेतात वीस फूट आत पलटी झाली.
रविवारी पहाटे पाच क्या दरम्यान हा अपघात घडला त्यामुळे या रस्त्यावर मॉर्निंग वॉक साठी जाणाऱ्यानी अपघात पहाण्यासाठी गर्दी केली होती.
जुने बेळगाव जवळील येडुरप्पा रोड वरील वळण धोकादायक बनू लागल आहे वारंवार अनेक अपघात या ठिकाणी घडत आहेत अश्या वेळी दिशादर्शक फलकांची संख्या वाढवण्याची गरज निर्माण झाली आहे. इनोवा मधील बसलेली सर्व युवक बेळगावचे असून जखमी झाले आहेत अशी माहिती उपलब्ध झाली आहे.