गोव्याच्या सार्वजनिक बांधकाम खात्याने बेळगाव चोर्ला रस्ता दुरुस्तीसाठी परवानगी(NOC) नाकारली आहे.’हेरॉल्ड गोवा’ च्या वृता नुसार सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD) गोवा आणि भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) बंगळुरू प्रादेशिक कार्यालय चोरला घाट गोवा-बेळगांव रस्त्याच्या दुरुस्तीच्या कामांवरून भांडण करत आहेत.
PWD गोवा ने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला डोंगराळ रस्त्याच्या गोवा विभागातील कामे हाती घेण्यासाठी NOC नाकारली आहे.बेळगाव ते गोवा या संपूर्ण मार्गाची दुरवस्था झाली असून नुकतीच बेळगावचे जिल्हा प्रभारी मंत्री गोविंद करजोळ यांनी आढावा बैठक घेतली असता त्यांनी सांगितले की, बेळगावी ते चोर्ला या मार्गाचे काम १४ नोव्हेंबरपासून सुरू होणार असून त्यात ते स्वतः भूमिपूजन करणार असल्याचे नमूद केले होते.
बेळगाव येथे दौऱ्यावर आलेल्या गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनीही या रस्त्याकडे तातडीने लक्ष देण्याची गरज असल्याचे सांगितले होते .
या कामात विनाकारण वाद निर्माण न करता सर्व प्रकारचे सहकार्य करण्याचे निर्देश मंत्र्यांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत.
हेराल्ड चा वृत्त अनुसार पुढे गोव्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री नीलेश काब्राल यांना यांनी सांगितलंय की “आम्ही चोरला घाट रस्त्याच्या गोवा विभागाची दुरुस्ती केली आहे. आम्ही त्यांची (NHAI) वाट पाहू शकलो नाही. या मार्गावरील रस्ता रुंदीकरण आणि इतर कामे हाती घेण्याची योजना NHAI ने आखली आहे. जेव्हा मी निविदा वाचली तेव्हा मला आढळले की हे तेच काम आहे जे आम्ही आधीच केले आहे.”
ते पुढे म्हणाले, “आम्हाला कामांची डुप्लिकेशन करायची नाही म्हणून मी कामाची एनओसी देण्यास नकार दिला आहे. मी आमचा रस्ता सोडण्यास सांगितले आहे. मी गोवा सीमेपासून तुमच्या (कर्नाटक) विभागापर्यंतची कामे हाती घेण्यास सांगितले आहे.