बेळगाव शहर परिसरातील रानंमाळे गेली, त्यामुळे स्मशानाला जागा मिळणेही दुरापास्त झाले आहे. शेतकऱ्यांकडून कवडीमोल किमतीने शेत जमिनी विकत घेऊन सरकार त्यांची 30 ते 70 लाख रुपये गुंठ्याने विक्री करते. याला संघटित विरोध दर्शवण्यासाठी सोमवारी 28 नोव्हेंबर रोजीच्या चाबूक मोर्चात सर्वांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन माजी जि. पं. सदस्या सरस्वती पाटील आणि समिती नेते आर. आय. पाटील यांनी केले आहे.
बेळगाव शहरालगतच्या जांभळी माळाचे आंबेडकरनगर, जाधवनगर मध्ये रूपांतर झाले. तांबाळचे माळाच्या ठिकाणी हनुमाननगर झाले. वडगी माळ हे सह्याद्रीनगर मध्ये परिवर्तित झाले, तर बेळगावचे जनावरे चारण्यासाठी असलेले विस्तृत माळ एपीएमसी मार्केट यार्ड मध्ये रूपांतरित झाले.
हे कमी होते म्हणून की काय शेतकऱ्यांची सुपीक जमीनी असलेल्या ठिकाणी कुमारस्वामी लेआउट स्थापन करण्यात आले. या पद्धतीने शहर परिसरातील सर्व रानंमाळे इतिहास जमा झाली. त्यामुळे स्मशानभूमीसाठी जागा मिळणाशा झाल्या आहेत. शेतकऱ्यांना कवडीमोल किंमत देऊन सरकार उद्या 30 ते 70 लाख रुपये प्रति गुंठ्याने शेत जमिनीची विक्री करते.
अशी परिस्थिती पुन्हा निर्माण होऊ नये यासाठी उद्या सर्वांनी एकत्र येऊन विरोध दर्शवावा, असे आवाहन माजी जि. पं. सदस्या सरस्वती पाटील आणि समिती नेते आर. आय. पाटील यांनी ग्रामीण भागातील जनतेसह शहरवासीयांना केले आहे.