कित्तूर तहसीलदार सोमलिंग हलगीआणि लिपिक प्रसन्न जी. हे लोकायुक्तांच्या सापळ्यात अडकले असून लोकायुक्त कर्मचाऱ्यांनी त्यांना हिंडलगा कारागृहात हजर केले आहे.
बेळगाव जिल्हा रुग्णालयात आरोग्य तपासणी करून त्यांना न्यायाधीशांसमोर हजर करण्यात आले असून सोमवार पर्यंत त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. सोमवारी पुन्हा न्यायालयात हजर राहण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. आज न्यायाधीशांसमोर हजर करून हिंडलगा कारागृहात त्यांची रवानगी करण्यात आली आहे.
एका जागेच्या प्रकरणी खाते बदल करण्यासाठी पैशांची मागणी केल्यावरून त्यांच्यावर हि कारवाई करण्यात आली आहे. या व्यवहारासाठी उभयतांनी २ लाख रुपयांची मागणी केल्याचा आरोप करण्यात आला असून याप्रकरणी त्यांच्यावर हि कारवाई झाली आहे.
कित्तूर तहसीलदार आणि लिपिक लोकायुक्तांच्या जाळ्यात अडकल्यानंतर आणखी एक घटना उघडकीस आली असून याचिकाकर्त्यांच्या वडिलांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे.
खोदानपूर या गावातील बापूसाहेब इनामदार असे या मृत व्यक्तीचे नाव आहे. १० एकर जमिनीसंदर्भातील व्यवहारात लाच मागितल्याप्रकरणी लोकायुक्तांकडे तक्रार करण्यासाठी आलेल्या राजेंद्र इनामदार यांचे ते वडील होत. बेळगाव लोकायुक्त पोलिसांनी काल रात्री छापा टाकून हि कारवाई केली आहे.