कर्नाटक राज्यात काँग्रेस जनता दलाचे सरकार आणाण्यात महत्वपुर्ण भूमिका बजावणारे भाजपचे माजी मंत्री गोकाकचे आमदार रमेश जारकिहोळी यांचा राज्यमंत्री मंडळात परत समावेश होणार याबाबत दिरंगाई होत असताना निधर्मी जनता दलाकडून एक वक्तव्य आले आहे.
माजी मंत्री आणि गोकाकचे आमदार रमेश जारकीहोळी यांनी जर निधर्मी जनता प्रवेश केल्यास त्यांचे स्वागतच असेल असे मत निधर्मी जनता दलाचे राज्य अध्यक्ष सीएम इब्राहिम यांनी म्हंटलय.
बेळगाव दौऱ्यावर असलेल्या इब्राहिम यांनी रविवारी सकाळी शासकीय विश्राम धामात पत्रकार परिषद घेतली त्यावेळी पत्रकाराने विचारलेल्या प्रश्नांना ते उत्तर देत होते.
निधर्मी जनता दल हा सामान्य जनतेचा पक्ष आहे. आमच्या पक्षाच्या तत्त्व सिद्धांतांचा स्वीकार करून जे कोणी येत असतील त्यांचे स्वागत करू मात्र याबाबतीत जिल्हास्तरावरील कमिटीशी चर्चा करून निर्णय घेण्यात येईल असे त्यांनी नमूद केले.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कर्नाटक राज्यभरात निधर्मी जनता दल पक्ष बळकट करण्यासाठी माजी मुख्यमंत्री कुमारस्वामी आणि मी स्वतः राज्याचा दौरा करणार आहे यासह माजी पंतप्रधान एच डी देवेगौडा देखील दौरा करणार असून हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते संपर्क करत असल्याचे असल्यास त्यांनी स्पष्ट केल.
थेट जनतेशी आम्ही संवाद साधत असूनआगामी विधानसभा निवडणुकीचे दृष्टिकोनातून प्रत्येक मतदारसंघात उमेदवार ठरवून त्यांना कामाला लागण्याच्या सूचना आम्ही केलेल्या आहेत.
बेळगावातील सुवर्ण सौध या इमारतीचा सदुपयोग झाला पाहिजे काम घेऊन बेळगाव भागातील लोकांनी बेंगलोरला यायची गरज नाही
राज्याचे सार्वमत्व टिकवण्यासाठी राज्यात जनता दलाचे सरकार सत्तेत येण्याची गरज त्यांनी यावेळी व्यक्त केली