अंगडी कॉलेजतर्फे आयोजित नृत्यउत्सव -2022 या खुल्या आंतरशालेय नृत्य स्पर्धेमध्ये महिला विद्यालय इंग्लिश मीडियम स्कूलने भरतनाट्यममध्ये द्रोपदी वस्त्रहरण व गीता संदेश देणारे नृत्य सादर करून प्रथम क्रमांक पटकाविला.
सदर आंतर शालेय नृत्य स्पर्धेत एकूण 16 शाळांच्या मुलांनी भाग घेतला होता.
त्यामध्ये महिला विद्यालय इंग्लिश मीडियम स्कूल मागोमाग द्वितीय क्रमांक अपूर्णेश्वरी मिडीयम स्कूल चिक्कोडी, तृतीय क्रमांक ओम सेंट्रल स्कूल कब्बूर, भरतेश सेंट्रल स्कूल हालगा व ज्योती सेंट्रल स्कूल बेळगावने मिळविला.
स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून विदुश्री श्रीमती रेखा हेगडे व पूजा नागलीकर यांनी काम पाहिले स्पर्धेनंतर आयोजित बक्षीस वितरण समारंभात सर्व विजेत्यांना बेळगावच्या खासदार मंगला अंगडी यांच्या हस्ते पारितोषिकं देण्यात आली.
स्पर्धेचे विजेतेपद मिळविणाऱ्या महिला विद्यालय इंग्लिश मीडियम स्कूलच्या नर्तकांना शाळेच्या नृत्य शिक्षिका सावली चव्हाण व अनुपमा निलजकर यांचाही यावेळी विशेष गौरव करण्यात आला.