Monday, December 30, 2024

/

जिल्ह्यातील 194 ग्रा.पं. तलावांमध्ये आता मत्स्यपालन

 belgaum

बेळगाव जिल्ह्यातील ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात येणाऱ्या 194 तलावांमध्ये मत्स्यपालन केले जाणारा असून या योजनेमुळे जिल्ह्याचे मत्स्य उत्पादनात सुमारे 15 टनापर्यंत वाढणार आहे. याखेरीज या योजनेच्या माध्यमातून ग्रामपंचायतींना महसूलही प्राप्त होणार आहे.

बेळगाव जिल्ह्यातील मत्स्य उत्पादनात दरवर्षी वाढ होत असून मागील पाच वर्षात हे उत्पादन 4651 टनाने वाढले आहे. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना शेततळे, मत्स्यतळे मंजूर करून देण्यासह तलाव, नदी, कालवे यामध्ये मत्स्य उत्पादन घेण्यास प्रोत्साहित केले जात आहे.

मत्स्य खात्याच्या कार्यक्षेत्रात 251 तलाव असून त्यापैकी 160 तलावांमध्ये तसेच हिडकल, नवलुतीर्थ जलाशय, घटप्रभा मलप्रभा, कृष्णा, मार्कंडेय नदीमध्ये मत्स्य पालन केले जात आहे. जिल्ह्यातील 160 तलावांमध्ये 5460 टन मत्स्य उत्पादन होत असून कृष्णा, घटप्रभा, मलप्रभा नदीमध्ये 300 टन, जिल्ह्यातील 20560 शेततळ्यांमध्ये 1240 टन, तर 70 हजार हेक्टर प्रदेशातील जलाशयात 1500 टन मत्स्य उत्पादन घेतले जात आहे. आता याला ग्रामपंचायत तलावांची ही जोड मिळणार आहे.Fishries

बेळगाव जिल्ह्यात 498 ग्रामपंचायती असून त्यांच्या मालकीचे 600 तलाव आहेत. कांही तलावांवर अतिक्रमण झाले असून गाळ न काढल्याने अनेक तलावात वर्षभर पाणी थांबत नाही तर 194 तलावात वर्षभर पाणी थांबते.

मच्छोद्योग खात्याकडून प्रत्येक तलावाला 4000 प्रमाणे एकूण 7 लाख 50 हजार माशांची पिले मोफत दिली जाणार आहेत. ग्रामपंचायत ही पिल्ले आपल्या तलावात सोडून मत्स्यपालन करण्याद्वारे पुढे त्याची विक्री ही करू शकणार आहेत. यातून मिळणारा सर्व महसूल ग्रामपंचायतचा असेल, असे मत्स्य खात्याचे उपसंचालक पी. सुधीर यांनी स्पष्ट केले आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.