कर्नाटक महाराष्ट्र सीमा प्रश्नी बुधवारी ३०रोजी होणारी पुन्हा पुढे ढकलली आहे.सदर सुनावणी साठी तीन नवीन न्यायाधीश बेंच लावण्यात आले आहे न्यायाधीश रजेवर असल्याने ही सुनावणी पुन्हा एकदा पुढे ढकलली आहे
त्यामुळे सदर सुनावणी गुरुवार १ डिसेंबर रोजी सुनावणी होऊ शकते किंवा त्यानंतर कधीही होऊ शकते अशी माहिती उपलब्ध झाली आहे.
सीमा प्रश्नाच्या सुनावणीच्या पाश्र्वभूमीवर मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी दिल्ली भेट दिली होती बोम्माई अमित शाह आणि आदी मोठ्या नेत्यांच्या भेटी घेणार आहेत त्यामुळे हा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेला आला आहे.
मुख्यमंत्री बोम्मई यांनी घेतली केंद्रीय संरक्षणमंत्र्यांची भेटनवी दिल्ली येथे आज मुख्यमंत्र्यांनी बोम्मई यांनी केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेऊन विविध मुद्द्यांवर चर्चा केली. बेळगावमधील ७३२.२४ एकर जमीन हि संरक्षण विभागाच्या ताब्यात असून सदर जमीन कर्नाटक राज्य सरकारकडे हस्तांतरित करण्यात यावी, अशी मागणी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांना केली.
राज्य सरकारच्या मालकीचे बेळगाव जिल्ह्यातील तुकमट्टी या गावातील ७३२.२४ एकर क्षेत्र संरक्षण विभागाच्या ताब्यात असून, तेथे कोणतेही विकास काम करता येणे शक्य होत नाही. विकासाच्या उद्देशाने ही जमीन बेळगावच्या जिल्हाधिकार्यांकडे सुपूर्द करण्यासाठी संरक्षण अधिकार्यांना योग्य ते निर्देश देण्याची विनंती त्यांनी केंद्रीय संरक्षणमंत्र्यांना केली. यावेळी मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव मंजुनाथ प्रसाद, जलसंपदा आणि नगरविकास विभागाचे अपर मुख्य सचिव राकेश सिंह उपस्थित होते.