युवासेना बेळगाव संचलित हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे फाउंडेशनतर्फे आज शहरातील ‘रेडी टू फाईट’ या लष्करी प्रशिक्षण केंद्राच्या मॅरेथॉन शर्यतीतील स्पर्धकांना केळी वाटप करण्याचा स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला.
‘रेडी टू फाईट’ या बेळगांवमधील लष्करी प्रशिक्षण केंद्रातर्फे आज रविवारी सकाळी मॅरेथॉन शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते.
या शर्यतीतील स्पर्धकांची आहाराची सोय करून त्यांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने युवासेना बेळगांव संचलीत ‘हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे फाउंडेशनच्या माध्यमातून केळी वाटप करण्यात आले.
ही केळी शिवसेनेचे बेळगाव शहर उपप्रमुख राजू तुडयेकर यांनी पुरस्कृत केली होती. केळी वाटपाप्रसंगी ठाकरे फाउंडेशनचे सदस्य हजर होते.
राजू तुडयेकर हे युवासेना बेळगांवला सामाजिक कार्यासाठी नेहमी मदत करत असतात. आज मॅरेथॉन शर्यतीतील स्पर्धकांना केळी वाटपाच्या उपक्रमास सहकार्य केल्याबद्दल युवा सेनेने त्यांचे आभार मानले आहेत.