Thursday, May 2, 2024

/

बेळगाव विमानतळाची झेप पुन्हा प्रगतीपथाकडे

 belgaum

बेळगाव : अल्पावधीतच प्रवाशांना उत्तम सुविधा पुरवत, पसंतीस उतरलेल्या बेळगावच्या सांबरा विमानतळाच्या पुन्हा प्रगतीच्या दिशेने झेप घेतली आहे. प्रवाशांच्या संख्येत होत चाललेली वाढ यामुळे सांबरा विमानतळाने चक्क हुबळी विमानतळालाही मागे टाकले आहे.

ऑक्टोबर महिन्यातील प्रवाशांची संख्या पाहता बेळगाव विमानतळावरील प्रवाशांची संख्या अधिक आहे. यामुळे बेळगाव विमानतळ राज्यातील सर्वाधिक वर्दळीचे विमानतळ ठरले आहे. सर्वाधिक विमानफेऱ्या करणाऱ्या विमानतळांपैकी पहिल्या क्रमांकावर बेंगळुरू आणि दुसऱ्या क्रमांकावर मंगळुरु विमानतळाचे नाव आहे.

ऑक्टोबर महिन्यात २७२६२ प्रवाशांनी बेळगाव विमानतळावरून प्रयाण केले आहे. एकूण ५२२ विमानफेऱ्या ऑक्टोबर महिन्यात झाल्या असून या तुलनेत एप्रिल ते ऑक्टोबर या कालावधीत बेळगाव विमानतळावरून ३६६४ विमानातून २,०४,००० प्रवाशांनी प्रवास केलाय तर हुबळी विमानळावरून ३१५६ विमानातून १,६३,००० प्रवाशांनी प्रवास केला आहे. हि आकडेवारी पाहता बेळगाव विमानतळाच्या हुबळी विमानतळालाही मागे टाकल्याचे निष्पन्न झाले आहे.
ऑक्टोबर मध्येही हुबळी विमानतळावरून २४३५९ प्रवाशांनी विमानप्रवास केला असून एकूण ४६८ विमानांनी उड्डाण भरले आहे. तर ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन महिन्यात बेंगळुरू आणि मंगळुरु पाठोपाठ हुबळी विमानतळाचा क्रमांक आहे. या कालावधीत हुबळी विमानतळ राज्यातील सर्वाधिक वर्दळीचे आणि तिसऱ्या क्रमांकाचे विमानतळ ठरले होते पण ऑक्टोबर महिन्यात हुबळी विमानतळाला मागे टाकत बेळगाव विमानतळ अव्वल ठरले आहे.

 belgaum

दरमहा देशातील सर्व विमानतळांवरील भारतीय विमानतळ प्राधिकरणाकडून विमानांची ये – जा आणि प्रवाशांची संख्या याबाबतची माहिती प्रसिद्ध केली जाते. त्या माहितीनुसार बेळगावचे सांबरा विमानतळ ऑक्टोबरमध्ये राज्यातील तिसऱ्या क्रमांकाचे सर्वाधिक वर्दळीचे विमानतळ ठरले आहे. जुलैमध्येही बेळगाव विमानतळ तिसऱ्या क्रमांकावर पोहोचले होते.

बेळगाव विमानतळ सातत्याने प्रगतीपथावरच आहे. पावसाळ्यातील दोन महिने वगळता बेळगाव विमानतळ प्रवाशांच्या वर्दळीच्या बाबत हुबळीच्या पुढेच आहे. विमानतळावर पुरविण्यात येणाऱ्या उत्तम सुविधांमुळे प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. आता या विमानतळावर विमानांच्या देखभाल आणि दुरुस्तीसाठी आरएमओ सुविधाही उपलब्ध करून दिली जाणार आहे. बेळगावच्या विकासाच्या दृष्टीने हि बाब महत्वपूर्ण ठरणार असून भविष्यात पुन्हा या विमानतळावरील फेऱ्यांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. चालू आर्थिक वर्षाची आकडेवारी तपासली असता विमानांच्या व प्रवाशांच्या संख्येत बेळगाव हुबळीपेक्षा नेहमीच पुढे राहिले असून आगामी हिवाळी अधिवेशनासाठी येणाऱ्या सर्व मंत्रीमहोदय आणि आमदारांच्या आगमनामुळे पुन्हा या फेऱ्या वाढणार आहेत.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.