के एल एस संस्थेच्या गोगटे इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजीचा एरोनॉटिकल शाखेचा विद्यार्थी अनुदीप कुलकर्णी याने एन सी सी मध्ये यश मिळवले आहे.
नुकत्याच झालेल्या जोधपूर येथील एन सी सी च्या ऑल इंडिया वायू सैनिक कॅम्पमध्ये कर्नाटक आणि गोवा संचालानायचे नेतृत्व करून कंट्रोल लाईन फ्लाईंग इव्हेंट मध्ये कास्य पदक पटकावले.
यापूर्वी त्याने वायू सैनिक कॅम्प मध्ये सहभागी होऊन सुवर्ण पदक पटकावले आहे.बीदर येथील एअर फोर्स स्टेशनमध्ये आयोजित केलेल्या
एअर फोर्स अटॅचमेंट मध्ये प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण केले आहे.एक भारत श्रेष्ठ भारत कॅम्पमध्ये देखील अनुदीप याने सहभाग नोंदवला होता.
त्याने संपादन केलेल्या यशाबद्दल गोगटे इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजीचे प्राचार्य डॉ.जयंत कित्तूर आणि एन सी सी समन्वयक प्रा. व्ही.व्ही. राजपूत यांनी अनुदीप कुलकर्णी यांचे अभिनंदन केले आहे.