Saturday, December 21, 2024

/

महाराष्ट्रातील गावांवर दावा म्हणजे ‘खयाली पुलाव’ -अजित पवार

 belgaum

महाराष्ट्राच्या सांगली जिल्ह्यातील जत आणि सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्याच्या गावांवर दावा सांगणारं कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांचं वक्तव्य निंदनीय असून त्यांचा मी तीव्र निषेध व धिक्कार करतो. केंद्र सरकारनं याप्रकरणात लक्ष घालून कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना आवरावं, असे परखड मत महाराष्ट्रातील विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी व्यक्त केले आहे.

सीमाप्रश्न सर्वोच्च न्यायालयात असताना कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांची अशी बेजबाबदार, प्रक्षोभक वक्तव्ये महाराष्ट्र सहन करणार नाही.

कर्नाटकचे मुख्यमंत्री भाजपचे असून त्यांनी अशी वक्तव्ये करणे तात्काळ थांबवावे. जत आणि अक्कलकोट तालुक्यातील गावांवरचा दावा त्यांच्यासाठी ‘खयाली पुलाव’ ठरेल. बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर, भालकीसह सीमाभागातल्या 814 मराठीभाषक गावं महाराष्ट्रात येणं हा खरा मुद्दा आहे.

ही गावं महाराष्ट्रात आल्यानंतरच संयुक्त महाराष्ट्राचं स्वप्न पूर्ण होणार आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या स्वप्नपूर्तीसाठी संपूर्ण महाराष्ट्र एकजुटीनं लढेल, असेही महाराष्ट्रातील विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी स्पष्ट केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.