Friday, April 26, 2024

/

कंग्राळी खुर्द येथे 4 डिसें. रोजी भव्य क्रिकेट स्पर्धा

 belgaum

सालाबाद प्रमाणे कंग्राळी खुर्द (ता. जि. बेळगाव) येथील मराठा साम्राज्य स्पोर्ट्स क्लबतर्फे श्री मसनाई देवी यात्रेनिमित्त येत्या रविवार दि. 4 डिसेंबर 2022 रोजी सायंकाळी 6 वा. आमदार कै. बी. आय. पाटील स्मृती चषक -2022 भव्य हाफपीच डे अँड नाईट क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

कंग्राळी खुर्द येथील मराठी मुला -मुलींच्या शाळेच्या मैदानावर ही स्पर्धा खेळविली जाणार आहे. खुल्या आणि गाव मर्यादित अशा दोन गटात होणारी ही स्पर्धा मर्यादित 6 षटकांची असणार आहे.

खुल्या गटातील विजेत्या आणि उपविजेत्या संघाला अनुक्रमे 51,111 रु. आणि 25,555 रु. तसेच चषक तर गाव मर्यादित गटातील विजेत्या आणि उपविजेत्या संघाला अनुक्रमे 11,000 रु. व 7,000 रु. तसेच चषक बक्षीसा दाखल दिला जाणार आहे.Cricket

 belgaum

याखेरीज मालिकावीर किताबासाठी 5000 रु. व चषक, उत्कृष्ट फलंदाज 2500 रु. व चषक आणि उत्कृष्ट गोलंदाज 2500 रु. व चषक अशी वैयक्तिक बक्षिसे पुरस्कृत करण्यात आली आहेत. मालिकावीर वगळता उर्वरित दोन वैयक्तिक बक्षिसे अंतिम सामन्यापुरती मर्यादित असतील.

तरी सदर भव्य क्रिकेट स्पर्धेत भाग घेऊ इच्छिणाऱ्या संघांनी अधिक माहिती व नांव नोंदणीसाठी किसन पाटील (9113 038227), पुंडलिक पाटील (8867501675) किंवा अजित पाटील (9019435318) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.