काकतीवेस रोड येथे पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य जलवाहिनीला गळती झाल्याने हजारो लिटर पाणी वाया जात आहे याकडे महापालिका प्रशासन आणि पाणीपुरवठा महामंडळाने साफ दुर्लक्ष केले आहे.
गेल्या दोन दिवसापासून बेळगाव शहरातल्या या काकतीवेसच्या मुख्य रस्त्यावर हजारो लिटर पाणी वाया जात असून याकडे दुर्लक्ष केल्याने स्थानिक लोकांतून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
या अगोदर बेळगाव शहरांमध्ये स्मार्ट सिटीच्या कामानिमित्त खुदाई करण्यात आली होती विकास कामासाठी खुदाई करण्यात आली होती त्यावेळी देखील अशाच प्रकारच्या पाणी गळत्या होत होत्या पाणीपुरवठा महामंडळ दुर्लक्ष करत होत होते अनेकदा जनतेला गळत्या रोखण्यासाठी आंदोलन देखील करावी लागली होती.
लोकप्रतिनिधीनी शासकीय अधिकाऱ्यांना धारेवर धरले होते मग कुठे पाणी पुरवठा महामंडळाला जाग आली होती मात्र काकतीवेस भागात कोणतीही रस्ता दुरुस्ती नसताना ही पाणी गळती झाली आहे असे असले तरी पाणीपुरवठा महामंडळाने याकडेही दुर्लक्ष केले आहे.
याबाबतीत स्थानिक नगरसेवकशंकर पाटील यांनी महापालिका प्रशासनाला याची तक्रार केली होती मात्र अद्याप देखील जलवाहिनी दुरुस्ती करण्यात आलेली नाही.काकतीवेस पासून शनिवार खुटकडे जाणाऱ्या रस्त्यावर दररोज लाखो लोकांची वर्दळ असते अनेक वाहने असतात मात्र रस्त्याच्या दोन्ही बाजूनी गळती झाल्याने पाणी वाहून जाऊ लागले आहे वाहन चालकांना आणि पादचाऱ्यांना याचा त्रास होत आहे.
तात्काळ महापालिका प्रशासनाने याची दखल घ्यावी पाणीपुरवठा महामंडळाने जलवाहिनी दुरुस्त करावी अशी मागणी या भागातील व्यापारी नागरिक करीत आहेत