ग्रहणानिमित्त परातीतील पाण्यात मुसळी उभ्या!-अवकाशात सूर्याला ग्रहण लागण्याची खगोलशास्त्रीय घटना घडण्यास सुरुवात झाली असून या सूर्यग्रहणानिमित्त सध्या शहरातील कपिलेश्वर मंदिरात नामस्मरण सुरू आहे.
दक्षिणकाशी कपलेश्वर मंदिरात आजच्या खंडग्रास सूर्यग्रहण निमित्त नामस्मरण सुरू झाले आहे. ग्रहण काळात पारंपारिक हिंदू पद्धतीनेनुसार धार्मिक स्थळांच्या ठिकाणी परातीतील पाण्यात मुसळ उभी करण्यात येतात.
अलीकडच्या आधुनिक युगात ही पद्धत लुप्त पावत चालली आहे. तथापि कपिलेश्वर मंदिरात ग्रहण काळात परातीतील पाण्यात मुसळ उभी करण्याची परंपरा आजतागायत जोपासली आहे. आजच्या सूर्यग्रहण काळात करण्यात येत असलेला हा दुर्मिळ धार्मिक प्रकार लक्षवेधी ठरत आहे.
ग्रहण निमित्त असे सुरू आहेत कार्यक्रम
बेळगावच्या कपलेश्वर मंदिरामध्ये नेहमी प्रमाणे पूजाविधी सुरु असून सकाळी ८ पासून शिवलिंगाला रुद्राभिषेक घालण्यात येत आहे. ग्रहण स्पर्श काळात शिवलिंगाला बेल पत्रात मढविण्यात आले असून यादरम्यान महामृत्युंजय जाप देखील करण्यात आला.
सूर्यग्रहण काळात शिवलिंगाला बिल्वपत्रात झाकून ठेवण्याचीही प्रथा आहे. ग्रहण काळात भाविकांना मंदिरात प्रवेश करण्यास कोणतीही बंदी नाही ,भक्तांना मंदिरात येऊन दर्शन घेण्यास व महामृत्युंजय जपा मध्ये सहभागी होण्याची परवानगी आहे, ग्रहणा नंतर मंदिराची स्वच्छता करून विशेष पूजा करण्यात येत आहे.
पारंपारिक पद्धतीने अत्यंत दुर्मिळ पावणारी ग्रहण काळातील पाण्यामध्ये लाकडी मुसळ-सूर्यग्रहण काळात बेळगाव शहरातील कपिलेश्वर मंदिरात चाललेलं नामस्मरण pic.twitter.com/fCQL87MFB8
— Belgaumlive (@belgaumlive) October 25, 2022