4G वरून 5G सीम कार्ड अपडेट करतो असे सांगत ऑनलाइन फसवणूक होऊ शकते बँकेच्या खात्यावरील काढून घेतले जाऊ शकतात यासाठी जनतेने खबरदारी बाळगावी असे आवाहन बेळगाव पोलिसांनी केले आहे.
देशात इंटरनेटची फाईव्ह-जी 5G सेवा सुरू झाली आहे याबाबत बेळगाव पोलिसांनी एक आवाहन केले आहे.
दूरध्वनीवर फोन किंवा मेसेजद्वारे कुणीही एअरटेल किंवा जियो कंपनीमधून बोलत आहे असे सांगून तुमचे सीम कार्ड 4G मधून 5G ला अपडेट करतो असे सांगत ओटीपी किंवा लिंक ओपन करा असे सांगत तुमच्या बँक खात्यावरील पैसे काढून घेण्याची शक्यता आहे.
यासाठी कोणत्याही कारणास्तव ओ टी पी देऊ नये किंवा अज्ञात लिंक क्लिक करू नये किंवा दूरध्वनी वरून माहिती विचारली असता बँकेच्या खात्याशी संबंधित कोणतीही माहिती देऊ नये असे आवाहन बेळगाव पोलिसांनी केले आहे.