बेळगाव येथील दुसऱ्या अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश व हर्षा ए हंजी यांनी अंमली पदार्थ बाळगल्या प्रकरणी सात आरोपींची साक्षीदारातील विसंगतीमुळे सबळ पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता करण्याचा आदेश बजावला आहे.
गौस सलीम बीडी रा. गँगवाडी,समीर पठाण रा.शिवाजीनगर,प्रकाश गंगारेड्डी रा.अंजनेयनगर,खताल पारेगार रा.रुक्मिणी नगर,बाबू कुल्लूर रा.न्यु गांधीनगर,विक्की माळगे रा.वीरभद्रनगर बेळगाव,फैज किल्लेदार रा.आझाद नगर बेळगाव यांची मुक्तता झाली आहे.
23 डिसेंबर 2017 रोजी या प्रकरणातील फिर्यादी माळ मारुती पोलीस निरीक्षक चन्नकेशव टिंगरिकर हे दुपारी 3 वाजता पोलीस स्थानकात असताना या प्रकरणातील संशयित आरोपी गौस बीडी आणि इतर सहा जण मिळून धर्मनाथ सर्कल,रामनगर,धर्मनाथ भवन जवळील खुल्या जागेत गांजा विकत असल्याची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक टेंगरीकर यांनी आपल्या सहकार्याचा धाड टाकून सात जणांना अटक करत गांजा जप्त केला होता.
पोलीस निरीक्षक टिंगरी कर यांनी या धाडीमध्ये सात जणांना अटक करत प्लास्टिकच्या पिशवी मधून विक्री करताना सव्वा किलो गांजा जप्त केला होता त्यानंतर पोलिसांनी अमली पदार्थ कायद्यांतर्गत दोघांवर कारवाई देखील केली होती.
सरकारी पक्षातर्फे सात साक्षीदार चार मुद्देमाल व 28 कागदोपत्री पुरावे कोर्टा समोर हजर करण्यात आले होते.संशयित आरोपींच्या वतीनं वकील प्रताप यादव,वकील हेमराज बेंचन्नवर,वकील महादेव कामगौडा,आर के हंजी यांनी काम पाहिले.