Friday, April 26, 2024

/

कडलास्‍कर बुवा जन्‍म शताब्‍दीनिमित्त शुक्रवारपासून संगीत महोत्‍सव

 belgaum

पंडित बी. व्ही. कडलास्कर बुवा स्मृती समारोह समितीतर्फे शुक्रवार (दि. २८) ते रविवारपर्यंत (दि. ३०) कडलास्कर बुवा जन्म शताब्‍दी महोत्सव कार्यक्रमाचे आयोजन कोनवाळ गल्लीतील लोकमान्‍य थिएटरमध्ये आयोजन केले आहे, अशी माहिती समितीचे अध्यक्ष राजप्रभू धोत्रे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.

शुक्रवारी (दि. २८) सायंकाळी ५ वाजता कार्यक्रमाचे उद्‌घाटन होणार आहे. यावेळी जयश्री सवागुंजी या सुगम संगीत सादर करणार आहेत. त्यानंतर हरिकाका भजन मंडळ यांचे भजन होणार आहे. तसेच विद्या मगदूम, निर्मला प्रकाश, महेश कुलकर्णी, गीता देशपांडे यांचे सुगम संगीत, तर विजय बांदिवडेकर व भक्ती भजनी मंडळाचा भजन कार्यक्रम होणार आहे. त्यानंतर अनिल चौधरी लिखित इथे करआमुची जुळती हा नाट्याविष्कार सादर केला जाणार आहे.

शनिवारी (दि. २९) सकाळी १० वाजता मधुवंती भिडे यांचे सुगम संगीत, राजेश बाळेकुंद्री यांचे हिंदुस्थानी संगीत, गायत्री अर्कसाली यांचे सुगम संगीत, वर्षा नेने यांचे हिंदुस्थानी संगीत, शुभा कुलकर्णी, उषा रानडे यांचे सुगम संगीत, लक्ष्मीनारायण भजनी मंडळाचा भजन कार्यक्रम, त्यानंतर संगीता कुलकर्णी, वनिश्री पूजार, अंजली जोशी व अर्चना ताम्हणकर यांचे सुगम संगीत, तसेच लिना विनोद यांचे हिंदुस्थानी संगीत होणार आहे.

 belgaum

सायंकाळी ५ वाजता सुक्रिती मराठे, मानसी गोखले यांचे सुगम संगीत, राघवेंद्र गुडी यांचे हिंदुस्थानी संगीत तसेच मंजुषी खोत, अनिता पगड, माधुरी मुतालिक देसाई, सीमा कुलकर्णी, अश्‍विनी जोशी, कमल कुलकर्णी यांचे सुगम संगीत, तर अनुराधा कुबेर या हिंदुस्थानी संगीत सादर करणार आहेत.

रविवारी गुरुप्रसाद भजनी मंडळाचे भजन, सोमनाथ जयदे व गुरुराज कुलकर्णी यांचे सुगम संगीत, गीता कुलकर्णी व जयतीर्थ मेवूनंदी यांचे हिंदुस्थानी संगीत होणार आहे. सायंकाळी ५ वाजता भवांजली भजनी मंडळाचा भजन कार्यक्रम, स्नेहा राजुरीकर यांचे हिंदुस्थानी संगीत होईल.

यावेळी होणाऱ्या कार्यक्रमाला के. एच. चन्नुर अध्यक्षस्थानी असतील. निलगंगा चरंतीमठ यांचे व्याख्यान होईल. यानंतर सुरेश बापट हिंदुस्थानी संगीत सादर करणार आहेत, अशी माहिती देण्‍यात आली.
यावेळी जयश्री सवागुंजी, महेश कुलकर्णी, गुरुराज कुलकर्णी, विजय बांदिवडेकर, सुधीर बोंद्रे आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.