रिंग रोड विरोधात सध्या तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यालयात तक्रार दाखल करण्याचे कार्य सुरू आहे. तालुक्यातील संबंधित गावांमधील शेतकऱ्यांनी आपल्या तक्रारी तालुका समितीच्या कार्यालयात येऊन करत आहेत.
गेल्या काही दिवसापासून हे कार्य सुरू असून 31 ऑक्टोबर पर्यंतच शेतकऱ्यांच्या तक्रार दाखल करण्याचे कार्य सुरू राहणार आहे. तेव्हा 31 ऑक्टोबर अगोदरच राहिलेल्या सर्व शेतकऱ्यांनी आपले तक्रार दाखल करण्यासाठी बेळगाव कॉलेज रोडवरील महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यालयात येऊन तक्रारी कराव्यात असे आवाहन तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने करण्यात येत आहे.
शेतकऱ्यांना वकील एम जी पाटील, अँड सुधीर चव्हाण, अँड श्याम पाटील हे तक्रार दाखल करून घेऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत आहेत.
तालुका समितीच्या कार्यालयात बैठक झाली या बैठकीमध्ये जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी रिंग रोड विरोधात हरकती दाखल कराव्यात असे आवाहन करण्यात आले बैठकीच्या वेळी माजी आमदार मनोहर किणेकर,माजी महापौर शिवाजी सुंठकर, बि डी मोहनगेकर मनोहर संताजी नारायण सागावकर व तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते.