येळ्ळूर येथे मूत्रपिंड निकामी झालेल्या त्या चिमुकलीला आर्थिक मदत देण्यासाठी श्रीराम सेना हिंदुस्थानचे अध्यक्ष रमाकांत कोंडुस्कर यांनी मदतीचा हात दिला आहे.
कोंडुस्कर यांनी उपचारासाठी श्रीरामसेना हिंदुस्थान चे राष्ट्रीय अध्यक्ष रमाकांत कोंडुस्कर यांनी भेट देऊन दहा हजारांची आर्थिक मदत दिली.यावेळी सतीश कुगजी,युवराज चव्हाण आदी उपस्थित होते.
जीवन मृत्यूशी झुंजणाऱ्या बालिकेसाठी आर्थिक मदतीचे आवाहन
बालपण म्हणजे मुलांच्या जीवनातील आनंदाने बागडण्याचे दिवस असतात. बालवयात कोणतीही चिंता आणि ताण नसतो, परंतु दुर्दैवाने याच्या नेमकी विरुद्ध परिस्थिती येळ्ळूर येथील एका बालिकेची झाली आहे. मूत्रपिंडांचा विकार बळावल्याने ही बालिका सध्या जीवन मृत्यूशी झुंज देत असून तिच्या उपचारासाठी आर्थिक मदतीचे आवाहन करण्यात आले आहे.
जीवन मृत्यूशी झुंज देत असलेल्या त्या बालिकेचे नांव कु. सुहानी संजय हुवन्नावर (वय 8 वर्षे) असे आहे. येळ्ळूर येथील सुहानी ही येळ्ळूरवाडी येथील केएचपीएस शाळेमध्ये इयत्ता तिसरीत शिकत आहे. मूत्रपिंडाच्या विकाराने त्रस्त असणाऱ्या सुहानी याच्यावर गेल्या 6 महिन्यापासून उपचार सुरू असून सध्या तिची दोन्ही मूत्रपिंड दुर्दैवाने निकामी झाली आहेत. आपल्या एकुलत्या एक मुलीवरील उपचारासाठी, तिचा जीव वाचवण्यासाठी हुवन्नावर दांपत्याने आपल्याकडील सर्व पैसा खर्ची घातला आहे. जिवंत राहण्यासाठी सध्या प्रत्येक दिवस सुहानी संघर्ष करत आहे. मात्र आपण आपल्या आजारावर मात करून बरे होऊ ही आशा तिने अद्यापपर्यंत सोडलेली नाही.
सुहानी वरील अधिक उपचारासाठी हुवन्नावर कुटुंबीयांना आर्थिक मदतीची गरज आहे. तरी शहरातील नागरिकांसह सामाजिक कार्यकर्ते, बिगर सरकारी संघटना (एनजीओ), सरकारी नोकरदार, राजकारणी आणि दानशूर व्यक्तींनी या कामी पुढाकार घेऊन सढळ हस्ते मदत करावी. जेणेकरून मूत्रपिंड प्रत्यारोपणाद्वारे सुहानी हुवन्नावर हिला जीवनदान मिळवून देण्याचे पुण्य संबंधितांना लाभणार आहे, असे आवाहन करण्यात आले आहे. यासाठी संबंधितांनी सुहानीचे वडील संजय हुवन्नावर (मो. क्र. 9164432648) यांच्याशी संपर्क साधावा.