बेळगावची नावाजलेली आशियाई पदक विजेती खेळाडू मलप्रभा जाधव हिने गुजरात मध्ये सुरू असलेल्या 36 व्या राष्ट्रीय खेळात यश संपादन केले आहे.
मलप्रभा हिने 48 किलो वजन गटात ज्यूडो मध्ये कांस्य पदकाची कमाई केली.
मलप्रभाला तिचे कोच त्रिवेणी एम एन आणि जितेंद्र सिंह बेळगाव तालुक्यातील चिरमुरी येथील चिरमुरी येथील तिचे वडील यल्लप्पा जाधव आई शोभा जाधव यांचे मार्गदर्शन लाभत आहे.
मलप्रभा हिने या अगोदर अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्पर्धातून यश मिळवले आहे गुजरात नॅशनल गेम्स मध्ये मिळवलेल्या यश बद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.
बेळगावची आंतरराष्ट्रीय ज्यूडो खेळाडू मलप्रभा जाधव हिने गुजरात मध्ये होत असलेल्या 36 व्या नॅशनल गेम्स मध्ये कांस्य पदक पटकावले आहे.@narendramodi @BelagaviDC @BSBommai pic.twitter.com/09ccaxla0s
— Belgaumlive (@belgaumlive) October 11, 2022