नवी दिल्ली येथे 20 ते 23 ऑक्टोबर दरम्यान खेलो इंडिया जुडो राष्ट्रीय लीग आणि रँकिंग स्पर्धेत बेळगाव तालुक्यातील तुरमुरी गावची कन्या मलप्रभा जाधव हिने प्रथम क्रमांक पटकावत सुवर्ण पदक मिळवण्यात यश मिळवले आहे.
मागील पंधरा दिवसांपूर्वी गुजरात नॅशनल गेम्स मध्ये देखील यश मिळवले होते तिला कांस्य पदक मिळाले होते आता दिल्लीतील या राष्ट्रीय स्पर्धेत यश मिळवले असून तिने यात गोल्ड मेडलची कमाई केली आहे.
राष्ट्रीय स्पर्धेतील आणखी एका मेडलची वाढ झाली आहे.मलप्रभा हिला प्रशिक्षक त्रिवेणी एम एन, जितेंद्र सिंह आणि वडील यल्लप्पा जाधव आई शोभा जाधव भाऊ मोहन जाधव यांचे मार्गदर्शन लाभत आहे.
या देखील जुन्या बातम्या वाचा: