Thursday, April 18, 2024

/

लंपी स्किनमुळे धामणे येथे बैलाचा मृत्यू

 belgaum

शहापूर गल्ली, धामणे (ता. जि. बेळगाव) येथील शेतकरी धनपाल गुमाजी यांचा एक बैल आज गुरुवारी सकाळी लंपी स्किन रोगामुळे मृत्युमुखी पडला.

धनपाल गुमाजी यांनी दोन वर्षांपूर्वी कित्तूर येथून 1 लाख 60 हजार रुपयांत बैलजोडी खरेदी करून आणली होती. शेतीच्या कामासाठी आणलेल्या या उमद्या बैलजोडीतील एक बैल गेल्या सुमारे 25 दिवसापासून लंपी स्कीन रोगामुळे आजारी होता.Ox lumpi

त्याच्यावर नियमित उपचार देखील सुरू होते. मात्र उपचाराचा फायदा न होता आज गुरुवारी सकाळी 11च्या सुमारास त्याचा मृत्यू झाला.

 belgaum

त्यामुळे धनपाल गुमाजी यांचे सुमारे 80 हजार रुपयांचे नुकसान झाले असून गुमाजी कुटुंबावर दुःखाची छाया पसरली आहे. गुमाजी यांच्या उमद्या बैलाच्या मृत्यूमुळे शहापूर गल्ली परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.