Monday, April 29, 2024

/

*लोकमान्य ऑर्थोपेडिक्सची बेळगाव येथे गुडघेदुखी व सांधेदुखीसाठी खास ओपीडी*

 belgaum

पुण्याच्या लोकमान्य हॉस्पिटलतर्फे गुडघेदुखीच्या आणि सांधेदुखीच्या रुग्णांसाठी सुपर स्पेशालिटी अस्थिरोग तपासणीचे आयोजन करण्यात आले आहे.

आंतरराष्ट्रीय कीर्तीचे सांधेरोपण तज्ज्ञ डॉ.नरेंद्र वैद्य हे शुक्रवार दि. २८ ऑक्टोबर २०२२ रोजी सायंकाळी ६ ते ७ या वेळेत अरिहंत हॉस्पिटल, तळमजला, डी मार्ट जवळ,नेहरू नगर,बेळगाव येथे गुडघेदुखी, खुबा, संधिवात तसेच इतर हाडाचे दुखीने त्रस्त असणाऱ्या रुग्णांची तपासणी करणार आहेत.

डॉ.नरेंद्र वैद्य हे पुण्यातील लोकमान्य हॉस्पिटल या मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचे व्यवस्थापकीय संचालक आहेत. विविध गावात सुपर स्पेशालिटी ओपीडी आयोजित करून रुग्णांना गुडघेदुखी विषयी मार्गदर्शन करणे,अत्याधुनिक उपचाराची माहिती व तपासणी केली जात आहे.
रुग्णांनी तपासणीसाठी येताना आपले पूर्वीचे रिपोर्ट,एक्सरे आणि अन्य काही रिपोर्ट आपल्या सोबत आणणे आवश्यक आहे.Narendra vaidhya

 belgaum

गुडघेदुखी ही समस्या ही आता ज्येष्ठ नागरिकांपुरती मर्यादित न राहता तरुणांमध्येही मोठ्याप्रमाणात असल्याचे दिसुन येत आहे. बदलत्या जीवनशैलीमुळे ,वाढत्या वजनामुळे गुडघ्यांच्या समस्यांनी अधिकच गुडघेदुखी होते.
गुडघ्याची तपासणी जर सुरुवातीच्या अवस्थेत केली तर औषधे व्यायामांनी आराम होतो. पण जर गुडघ्यातील कुर्चेची झीज झाली असेल तर मात्र आजकाल दुर्बिणीद्वारे उपचार, पी आर पी इंजेक्शन याव्दारे करता येतात.

अंतिम टप्प्यातील झीज ,पायाला बाक आला तर मात्र सांधेरोपण शस्त्रक्रिया हाच पर्याय असतो. यात आता आमुलाग्र बदल होवुन रोबोटीकचा सहभाग यशस्वी ठरतो आहे. ही यंत्रणा भारतात आणुन रुग्णांना उपलब्ध करुन देणारे विख्यात तज्ञ डाॅ. नरेंद्र वैद्य स्वतः रुग्णांची तपासणी करणार आहेत.
डॉ.नरेंद्र वैद्य हे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे गुडघेरोपण आणि मणक्याचे तज्ज्ञ म्हणून ओळखले जातात.Lokmanya hospital

पुण्यातील लोकमान्य हॉस्पिटल प्रा.ली. चे ते कार्यकारी संचालक आहेत.जगातील दहा देशात त्यांनी अवघड शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पाडल्या आहेत. ३०,००० हून अधिक गुडघेरोपण शस्त्रक्रिया १०,००० रोबोटीक तंत्रज्ञानाचा वापर करून आणि १,५०,००० हुन अन्य अस्थिरोग शस्त्रक्रिया त्यांनी केल्या आहेत.

रोबोटीक शस्त्रक्रियेचे अमेरिका, जर्मनी आणि स्वीडन येथे प्रशिक्षण त्यांनी घेतले आहे. गुडघ्याच्या सांधेरोपण शस्त्रक्रियेतील रोबोच्या सहाय्याने सांधेरोपण हे तंत्रज्ञान अमेरिकेबाहेर भारतात प्रथम आणुन त्यांनी १०,००० पेक्षा अधिक शस्त्रक्रिया यशस्वी केल्या आहेत.

Chougule R m
वैद्य यांनी बी जे मेडिकल कॉलेजमधून एम बी बी एस पदवी संपादन केली. नंतर ऑर्थोपीडिक्समध्ये उच्च शिक्षण घेऊन सुवर्णपदक मिळवले. १०० हुन अधिक त्यांचे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय मॅगझीनमध्ये त्यांचे शोध प्रबंध प्रसिद्ध झाले आहेत. देश विदेशात शंभरहून अधिक व्याख्याने त्यांनी दिली आहेत. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय संस्थांचे ते मानद सदस्य असून अनेक महत्त्वाच्या समित्यांवर त्यांनी जबाबदारी पार पाडली आहे. ऑर्थोपेडिक हॉस्पिटलची साखळी त्यांनी स्थापन केली आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून सर्वसामान्य जनतेला उपचार मिळावेत यासाठी ते कार्यरत आहेत.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.