Friday, December 27, 2024

/

खानापूर समिती काढणार ‘भगवा संपर्क यात्रा’

 belgaum

1 नोव्हेंबर काळा दिन तालुक्यातील मराठी भाषिकांनी गांभीर्याने पाळावा यासाठी मराठी भाषिक असलेल्या गावांमध्ये जनजागृती करण्यात यावी. तसेच म. ए. समितीची संघटना मजबूत करण्यासाठी तालुक्यातील प्रत्येक मराठी गावांमधून भगवा झेंडा संपर्क यात्रा काढण्याचा निर्णय खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या बैठकीत घेण्यात आला.

खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची बैठक आज गुरुवारी श्री लक्ष्मी देवी मंदिर खानापूर येथे समितीचे अध्यक्ष गोपाळराव देसाई यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी समितीचे सर्व कार्यकारणी सदस्य हजर होते. येणारा 1 नोव्हेंबर काळा दिन तालुक्यातील मराठी भाषिकांनी गांभीर्याने पाळावा व त्याची जनजागृती संपूर्ण तालुक्यामधील मराठी भाषिक असलेल्या गावांमध्ये कशा पद्धतीने करावी याचे नियोजन बैठकीत करण्यात आले.

यावेळी काळा दिनाच्या जागृतीसाठी तालुक्यातील प्रत्येक गावामध्ये जाऊन लोकांशी संपर्क साधून कोपरा सभा घेण्याचे एकमताने ठरवण्यात आले. जनजागृतीची सुरुवात कणकुंबी येथील श्री माऊली देवी मंदिरापासून शनिवारी 15 ऑक्टोबर रोजी करण्याचे ठरले.Khanapur mes

याप्रसंगी राजाराम देसाई, पी. एच. पाटील, पांडुरंग सावंत, गोपाळराव पाटील, युवा समितीचे अध्यक्ष धनंजय पाटील, सुरेश देसाई व निरंजन सरदेसाई यांनी समयोचित विचार व्यक्त केले. दरवर्षीप्रमाणे शिवस्मारक या ठिकाणी सकाळी 10 ते दुपारी 3 पर्यंत धरणे आंदोलन धरून केंद्र सरकारचा निषेध करण्याचे बैठकीत ठरले. तसेच समितीची संघटना मजबूत करण्यासाठी 1 नोव्हेंबर नंतर तालुक्यातील प्रत्येक मराठी गावात भगवा झेंडा पद यात्रेने संपर्क साधला जाईल. गावागावात समितीची संघटना बळकट करण्यासाठी समितीचा भगवा झेंडा खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे देण्यात यावा असे मत युवा समितीचे अध्यक्ष धनंजय पाटील यांनी मांडले. यास निरंजन सरदेसाई व सुरेश देसाई यांनी दुजोरा दिला व त्यासाठी नियोजन करण्याचे ठरविण्यात आले.

यावेळी अध्यक्ष गोपाळराव देसाई यांनी बैठकीतील सर्व निर्णयांना माझा पूर्ण पाठिंबा आहे असे सांगून येणारा 1 नोव्हेंबर गांभीर्याने पाळण्यासाठी समितीच्या सर्व कार्यकारणी सदस्यांनी जोमाने कामाला लागावे. प्रत्येक मराठी भाषिकास काळा दिनाचे गांभीर्य सांगून निषेध सभेत भाग घेण्यासाठी प्रेरित करावं असे सांगितले. यावेळी समितीचे ज्येष्ठ नेते देवाप्पाजी गुरव, सूर्याजी पाटील, विनायक सावंत, रवींद्र शिंदे, रवींद्र पाटील, बळीराम पाटील, दत्तू कुठरे, युवा समितीचे कार्याध्यक्ष किरण पाटील, प्रतीक देसाई आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.