स्वतःचं वजन 102 किलो झालं तेंव्हा सुदृढ आरोग्य आणि तंदुरुस्तीचे महत्त्व कळालं आणि त्यानंतर गोकाक तालुक्यातील घटप्रभा पोलीस ठाण्याचे सीपीआय श्रीशैल बॅकुड यांनी वजन 75 किलोनी घटवत आरोग्यदायी जीवनाच्या दिशेने वाटचाल सुरू झाली. ज्यामुळे लक्षणीय शारीरिक धमक आणि आरोग्यासाठी त्यांचे नांव फोरेव्हर स्टार बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाले आहे.
बॅकुड जे सध्या 38 वर्षाच्या आहेत त्यांचे वजन एकेकाळी 100 किलो पेक्षा जास्त होते आणि 2014 मध्ये आपले वजन अवास्तव आहे ही बाब त्यांच्या लक्षात आली. याच कालावधीत बॅकुड कुटुंबीयांच्या कांही हितचिंतकांसह पत्नी स्मिता यांनी काळजीपोटी श्रीशैल यांना तंदुरुस्त आरोग्यासाठी वजन कमी करण्याचा सल्ला दिला. हा सल्ला पटल्यामुळे श्रीशैल यांनी पत्नी स्मिताच्या मदतीने प्रारंभी डायटिंग सुरू केले. त्यानंतर जिम्नेशियमला जाण्यास सुरुवात केली आणि कालांतराने धावणे, पोहणे, सायकलींग आणि लॉन टेनिस खेळणे हे व्यायाम सुरू केले.
अलीकडेच कोल्हापूर येथे पार पडलेल्या हाफ आयर्न ट्रायथलॉन या तीन क्रीडा प्रकार असलेल्या खडतर शर्यतीत श्रीशैल बॅकुड यांनी चमकदार कामगिरी नोंदविली आहे. कोल्हापूर स्पोर्ट्स क्लब आयोजित सदर शर्यतीमध्ये पोहणे, सायकलींग आणि धावणे या सलग तीन स्पर्धा 10 तासाच्या आत पूर्ण करायच्या होत्या. मात्र पोलीस अधिकारी श्रीशैल बॅकोड यांनी त्या अवघ्या 6 तास 39 मिनिटात पूर्ण केल्या. श्रीशैल यांनी पोहण्याची 1.9 कि. मी. अंतराची स्पर्धा 52 मिनिट 48 सेकंदात, 90 कि. मी. सायकलिंग स्पर्धा 2 तास 57 मिनिटात आणि 21 कि. मी. धावण्याची शर्यत 2 तास 28 मिनिटात पूर्ण केली. या कामगिरीमुळे त्यांचे नांव फोरेव्हर स्टार बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाले आहे.
या संदर्भात बोलताना सीपीआय बॅकुड म्हणाले की, 2014 मध्ये माझे वजन 102 किलो होते. त्यानंतर 2019 मध्ये ते 96 किलो इतके कमी झाले आणि 2020 पासून आजतागायत माझे वजन 75 किलो इतके स्थिर आहे. यात कोणती जादू नसून चांगल्या व्यायामामुळे मला ते शक्य झाले आहे.
तसेच वयाच्या 35 व्या वर्षी स्वतःच्या सुदृढ आरोग्यापेक्षा काहींही जास्त महत्त्वाचे नाही हे जेंव्हा मला कळाले त्यामुळेच हे घडले असे सांगून वजन कमी करून आरोग्य तंदुरुस्त ठेवण्याची प्रेरणा आपण हुबळीचे सीपीआय मुर्गेश चनण्णावर यांच्यापासून घेतल्याचे बॅकुड यांनी स्पष्ट केले.
शारीरिक तंदुरुस्तीसाठी दररोज सुमारे 3 ते 4 तास वेळ देणाऱ्या बॅकुड यांनी आठवड्यातून दोनदा आपण होण्याचा व्यायाम करतो. इतर दोन दिवशी सायकलिंग आणि धावण्याचा सराव करतो, तर उर्वरित दिवसांमध्ये जिम्नॅशियमला जाण्याबरोबरच लॉन टेनिस खेळतो. त्याचप्रमाणे पत्नी स्मिता इच्छा मार्गदर्शनाखाली कमी तेलाच्या डाळी, भाज्या, फळे आणि ओट्स यांचा अंतर्भाव असलेल्या डायटचे काटेकोर पालन करतो अशी माहिती दिली. प्रत्येकाने पैशापेक्षा स्वतःच्या आरोग्याला सर्वाधिक महत्त्व दिले पाहिजे. तंदुरुस्त आरोग्यासाठी प्रत्येकाने दिवसातील ठराविक वेळ व्यायामासाठी राखून ठेवावयास हवा असे मतही त्यांनी व्यक्त केले.
हाफ आयर्नमध्ये सुवर्णपदक पटकावणारे सीपीआय श्रीशैल बॅकुड कर्नाटक राज्य पोलीस खात्यातील पहिले कर्मचारी आहेत. आता येत्या ऑगस्ट 2023 मध्ये तुर्कीस्तान येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भाग घेण्याचा त्यांचा मानस आहे. यासाठी परवानगी करिता त्यांनी आपल्या खात्याकडे अर्जही केला आहे. पोलीस खात्यातील प्रामाणिक सेवेबद्दल गेल्या 2019 मध्ये मुख्यमंत्री पदक मिळविणारे बॅकुड उत्तम आरोग्य आणि तंदुरुस्तीसाठी समाजामध्ये जनजागृती करत असतात.
त्यामुळे आता घटप्रभा पोलीस ठाण्यामधील कर्मचारीवर्ग देखील आपले आरोग्य तंदुरुस्त राहील यावर लक्ष केंद्रित करू लागला आहे. उपरोक्त यश मिळवण्यासाठी आपले वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी आणि प्रामुख्याने पत्नी स्मिता यांनी सहकार्य, पाठिंबा आणि प्रोत्साहन दिल्याबद्दल सीपीआय श्रीशैल बॅकवर्ड यांनी त्यांचे आभार मानले आहेत.
Very nice sir