स्वयंपाक करताना झालेल्या सिलेंडर ब्लास्ट मध्ये एका युवकाचा मृत्यू झाल्याची घटना बेळगाव जिल्ह्यातील मुडलगी पोलीस स्थानक कार्यक्षेत्रातील नागनुर या गावात घडली आहे.
भाड्याच्या घरामध्ये पहिल्या मजल्यावर राहणाऱ्या 19 वर्षीय युवकाचा या सिलेंडर ब्लास्ट मध्ये मृत्यू झाला आहे. श्रीधर पॅटी असे या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या युवकाचे नाव असून तो विद्यार्थी असल्याची माहिती देखील समोर आली आहे.
पहिल्या मजल्यावर सिलेंडर ब्लास्ट झाल्याकारणाने घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे या घरात नर्सिंगचा विद्यार्थी राहत होता तो मृत्युमुखी पडला आहे
सदर घटना घडताचं नागनूर गावामध्ये काही वेळेसाठी भीतीचे वातावरण निर्माण झाले होते मात्र घटनास्थळी पोलिसांनी धाव घेऊन वातावरण शांत केले.