Monday, December 30, 2024

/

पाहणी करून सायकल फेरीला परवानगी -डीसीपी गडादी

 belgaum

महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेतृत्वाखाली येत्या 1 नोव्हेंबर काळा दिनानिमित्त काढण्यात येणाऱ्या सायकल फेरीच्या मार्गाची सर्वप्रथम पाहणी करून त्यानंतर ही फेरी काढण्यास परवानगी दिली जाईल, असे आश्वासन पोलीस उपायुक्त (डीसीपी) रवींद्र गडादी यांनी दिले आहे.

भाषावार प्रांतरचनेवेळी बेळगावसह सीमाभाग अन्यायाने कर्नाटकात डांबला गेल्याच्या निषेधार्थ दरवर्षीप्रमाणे येत्या 1 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेतृत्वाखाली हरताळ पाळण्याबरोबरच निषेधात्मक सायकल फेरी आणि जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. त्या संदर्भात चर्चा करण्यासाठी आज बुधवारी पोलीस प्रशासनाच्यावतीने अशोकनगर येथील एसीपी कार्यालयाच्या ठिकाणी मध्यवर्तीय महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक बोलवण्यात आली होती. याप्रसंगी अध्यक्ष स्थानावरून बोलताना पोलीस उपायुक्त गडादी यांनी उपरोक्त आश्वासन दिले. बैठकीत 1 नोव्हेंबर रोजीची सायकल फेरी आणि जाहीर सभा या संदर्भात चर्चा करण्यात आली. यावेळी सायकल फेरीचा ध. संभाजी चौक येथून सुरू होणारा जो मार्ग आहे त्याची संपूर्ण पाहणी करून आम्ही ताबडतोब सायकल फेरीला परवानगी देऊ असे पोलीस उपायुक्तांनी सांगितले. तसेच 1 नोव्हेंबरची जाहीर सभा लवकरात लवकर आटोपती घेण्यात यावी अशी सूचना करताना त्यांनी बाहेरून परगावची कोणी नेतेमंडळी सभेला येणार आहेत का? याची चौकशी केली. त्यावेळी समितीच्या पदाधिकाऱ्यांनी आम्ही प्रत्येक राजकीय पक्षाच्या अध्यक्षाला तुमचा प्रतिनिधी पाठवा असे पत्र पाठवले आहे. मात्र आत्तापर्यंत कोणाचा प्रतिसाद आलेला नाही, असे स्पष्ट केले.

बैठकीस समितीचे कार्याध्यक्ष माजी आमदार मनोहर किणेकर, सरचिटणीस मालोजीराव अष्टेकर, खजिनदार प्रकाश मरगाळे, जनसंपर्कप्रमुख विकास कलघटगी, माजी महापौर शिवाजी सुंठकर, ॲड. एम. आर. पाटील, पुंडलिक पावशे, युवा आघाडीचेअध्यक्ष संतोष मंडलिक, माजी ता. पं. सदस्य सुनील अष्टेकर, माजी नगरसेवक रणजीत चव्हाण -पाटील आदींसह एसीपी नारायण बरमनी, एसीपी चंद्रप्पा, सीपीआय निंबाळकर हे वरिष्ठ पोलिस अधिकारी उपस्थित होते.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.