गेल्या ६६ वर्षांपासून महाराष्ट्रात जाण्यासाठी तळमळणाऱ्या सीमावासीयांकडून महाराष्ट्रातील सर्वपक्षीय नेत्यांना निवेदने सादर करून विनंत्या करण्यात येतात.
कोणत्याही परिस्थितीत सीमाप्रश्न सुटावा यासाठी सीमावासीयांची तळमळ सुरु असते. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे युवानेते अमित राज ठाकरे यांच्याकडे बीडला (भालकी) येथील सीमावासियांच्या शिष्टमंडळाने निवेदन सादर केले आहे.
महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद गेली ६४ वर्षे उच्च न्यायालयात आहे.बेळगाव खानापुर,कारवार,निपाणी,बिदर-भालकी अरुरड संथपुर सिमभागातले मराठी बांधव आतुरतेने वाट बघत आहेत की उच्च न्यायालय तमाम मराठी भाषिकांना या प्रशासकीय त्रासातून मुक्त करेल.सीमावासीयांना न्याय लवकरात लवकर मिळावा यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे युवानेते अमित राज ठाकरे यांच्याकडे बिदर-भालकी मराठी युवकांनी सीमाभागाच्या वतीने निवेदन सादर करण्यात आले आहे.
राज ठाकरे यांनी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्याप्रमाणे सीमाभागाच्या मराठी जनतेच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
या शिष्टमंडळात दिनेश मुदाळे,राम वाघमारे,गणेश घोरवाडे,नामदेव वाघमारे, सोमनाथ देशमुख आदी कार्यकर्त्यांचा समावेश होता.