बेळगावच्या स्वीमर्स क्लब आणि एक्वेरियस स्विम क्लबच्या 10 जलतरणपटूंनी बंगलोर येथे नुकत्याच पार पडलेल्या एसजीएफआय राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेत चमकदार कामगिरी नोंदवत एसजीएफआय राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी कर्नाटक संघात स्थान मिळवले आहे. राज्यस्तरीय स्पर्धेत या दोन्ही क्लबच्या जलतरणपटूंनी एकूण 5 सुवर्ण, 11 रौप्य आणि 7 कांस्य पदकं अशा तब्बल 23 पदकांची लयलूट केली आहे.
बसवनगुडी एक्वेटिक सेंटर, बेंगलोर येथे गेल्या 13 व 14 ऑक्टोबर रोजी एसजीएफआय राज्यस्तरीय जलतरण स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत चमकदार कामगिरी नोंदवत राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धांसाठी निवड झालेले स्वीमर्स क्लब आणि एक्वेरियस स्विम क्लबचे जलतरणपटू पुढीलप्रमाणे आहेत.
अमन सूनगार -100 मी. बॅकस्ट्रोक सुवर्ण, 200 मी. बॅकस्ट्रोक सुवर्ण, 200 मी. इंडिव्हिज्युअल मिडले सुवर्ण. सनत अनंत भट -100 मी. बॅकस्ट्रोक कांस्य, 200 मी. बॅकस्ट्रोक रौप्य, खुशी हेरेकर -100 मी. बॅकस्ट्रोक कांस्य, 200 मी. बॅकस्ट्रोक रौप्य. सार्थक श्रेयकर -100 मी. बॅकस्ट्रोक रौप्य, 50 मी. बॅकस्ट्रोक रौप्य. समर किल्लेकर -200 मी. ब्रेस्ट स्ट्रोक सुवर्ण. यशराज पावशे -200 मी. ब्रेस्ट स्ट्रोक सुवर्ण, 200 मी. बटरफ्लाय स्ट्रोक रौप्य, 50 मी. ब्रेस्ट स्ट्रोक रौप्य. दर्शन वरूर -100 मी. फ्रीस्टाइल रौप्य. लावण्या अदीमणी -100 मी. फ्रीस्टाइल रौप्य, 100 मी. बटरफ्लाय कांस्य. समीक्षा घसारी -200 मी. बटरफ्लाय स्ट्रोक रौप्य, 200 मी. इंडिव्हिज्युअल मिडले रौप्य. अर्णव निर्मळकर -50 मी. ब्रेस्टस्ट्रोक रौप्य. मनीकांत काळे -200 मी. बटरफ्लाय कांस्य. त्रिया कुरमुडे -200 मी. बटरफ्लाय कांस्य. 17 वर्षाखालील मुले :4×100 मी. मिडले रिले मुले -रौप्य पदक (अमन, दर्शन, सनथ). 14 वर्षाखालील मुले : 4×100 मी. मिडले रिले -कांस्य पदक (सार्थक, ओजस, यशराज). 14 वर्षाखालील मुली : 4×100 मी. रिले -रौप्य पदक (त्रिया, लावण्या, समीक्षा). 17 वर्षाखालील मुले : 4×100 मी. फ्रीस्टाइल रिले -रौप्य पदक (अमन, सिद्धांत, दर्शन). 17 वर्षाखालील मुले : 4×100 मी. फ्रीस्टाइल रिले -कांस्य पदक (यशराज, सार्थक).
उपरोक्त सर्व जलतरणपटू सुवर्ण जेएनएमसी जलतरण तलावात पोहोण्याचा सराव करत असून त्यांना प्रशिक्षक अक्षय शेरेगार, अजिंक्य मेंडके, नितेश कुडूचकर व गोवर्धन काकतकर यांचे मार्गदर्शन लाभत आहे.
तसेच त्यांना केएलई सोसायटीचे अध्यक्ष डाॅ. प्रभाकर कोरे, काहेर विद्यापीठाचे उपक्रम डाॅ. विवेक सावजी, रो. अविनाश पोतदार, लता कित्तूर, माणिक कापाडिया, उमेश कलघटगी, सुधीर कुसाणे आणि प्रसाद तेंडुलकर यांचे प्रोत्साहन लाभत आहे.