Friday, December 20, 2024

/

स्वामी विवेकानंदांच्या बेळगाव भेटीला १३० वर्षे

 belgaum

स्वामी विवेकानंदांनी भारत भ्रमण करताना १६ ते २७ ऑक्टोबर १८९२ कालावधीत बेळगावात वास्तव्य केले होते.त्या निमित्ताने रविवार दि.१६ ऑक्टोबर रोजी स्वामीजींनी वास्तव्य केलेल्या रिसालदार गल्ली येथील स्वामी विवेकानंद स्मारक येथे दिवसभर विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.

सकाळी सहा ते सायंकाळी सात या वेळेत विवेकानंद स्मारकाला भेट देऊन स्वामीजींचा आशीर्वाद व प्रसाद घ्यावा असे आवाहन रामकृष्ण मिशन वतीने करण्यात आले आहे.

विवेकानंद स्मारकात स्वामीजींनी बेळगाव वास्तव्यात वापरलेला खाट,आरसा आणि लाठी देखील जतन करून ठेवण्यात आली आहे.स्वामीजींच्या जीवनावर आधारित चित्र प्रदर्शन देखील भेटीच्या वेळी भक्तांना पाहता येईल.Swami vivekananda

सायंकाळी पावणे सहा ते सात या वेळेत कन्नड भजन आणि मराठी प्रवचनाचा कार्यक्रम होणार आहे.सायंकाळी सात ते रात्री साडे आठ या वेळेत योध्दा सन्यासी स्वामी विवेकानंद हा एकपात्री प्रयोग पुण्याचे राष्ट्रीय कलाकार दामोदर रामदासी सादर करणार आहेत.

रामकृष्ण मिशन आश्रमाचे सचिव स्वामी आत्मप्राणानंद यांनी जनतेला कार्यक्रमाला उपस्थित राहावे असे आवाहन केले आहे.swami-vivekanand-memorial-2

हे देखील आवर्जून वाचा…

130 वर्षां पूर्वी बेळगावात होते विवेकानंदांचे वास्तव्य

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.