Saturday, November 16, 2024

/

गृहिणींच्या बजेटला पुन्हा दरवाढीची झळ

 belgaum

देशभरात दरवाढीवरून अनेक आंदोलने होत आहेत. सरकारकडून करण्यात आलेली दैनंदिन वस्तुंवरील दरवाढ, अतिवृष्टीमुळे पिकांचे झालेले नुकसान यामुळे अडचणीत आलेला शेतकरी आणि दरवाढीची झळ सोसत असलेला सर्वसामान्य नागरिक दिवसेंदिवस वाढत चाललेल्या दैनंदिन वस्तूंच्या किमतीमुळे मेटाकुटीला आला आहे.

बेळगाव एपीएमसीमध्ये पालेभाज्यांचे दर वधारले असून खाद्यतेल वगळता इतर धान्यांच्या दरात वाढ झाली आहे. टोमॅटो, कोथिंबीर, मिरचीचे दर देखील वधारले आहेत. कांदा, बटाटा दर जैसे थे असून टोमॅटोचे दर मात्र प्रतिकिलो ४० ते ५० रुपयापर्यंत पोहोचले आहेत. २० ते २५ रुपये किलो मिरची तर ३० ते ४० रुपये प्रति जुडी कोथिंबीर असे दर सध्या सुरु आहेत.

किराणा सामानातील खाद्यतेलाच्या दरात घट झाली असली तरी तूर डाळीच्या दरात किंचित वाढ झाली आहे. १३० रुपये प्रतिकिलो असे तूरडाळीचे दर आहेत तर सूर्यफूल, शेंगा, सोयाबीन व पाम तेल दरात किलोमागे ६ रुपयांनी घट झाली आहे.Vegetables

साखर ३८ रुपये प्रतिकिलो, साधा चहा ३२० प्रतिकिलो, दार्जिलिंग चहा ४४०, बारीक रवा ३८, केसरी रवा ४५, मोठा रवा ४०, इडली रवा ३४, मैदा ३८, आटा ३६, बेसन ९०, माध्यम पोहे ५०, डिलक्स पोहे ५०, साबुदाणा ६०, वरी तांदूळ १००, वाटी खोबरे १४०, हळकुंड १८०, हळद पावडर १४०, मोहरी १००, वेलची १९००, तूरडाळ १२४ ते १३०, हरभरा डाळ ८४, मुगडाळ १४० ते १५०, मसूरडाळ ७० ते ७४, उडीद डाळ ९४ ते १०४, हरभरा ६४ ते ७८, जवारी मसूर १८० ते २००, नाशिक मसूर २५० ते २६०, मूग ८२ ते ९४, मटकी ८२ ते ८४, चवळी ४८ ते ५२. गुल ३२ ते ३४, गहू ३० ते ३२, शेंगा ७७ ते ७८ असे दर सध्या सुरु आहेत.

भाजीपाल्यामध्ये टोमॅटो ४० ते ५० रुपये प्रतिकिलो, वांगी २० ते २५, ढोबळी मिरची ४० ते ५०, जवारी मिरची ३० ते ४०, बिट ४० ते ५०, गवार २५ ते ३०, जवारी गवार ४० ते ५०, भेंडी २५, बीन्स ३० ते ४०, कोबी ८ ते १० प्रतिकिलो, फ्लॉवर १५ ते २०, काकडी ३० ते ४०, कारली २५ ते ३०, गाजर ४० ते ५०, मेथी ६ ते ८ रुपये प्रतिजुडी, लालभाजी १० ते १२ रुपये प्रतिजुडी, कांदापात ३ ते ४ रुपये प्रतिजुडी असे भाजीपाल्याचे दर आहेत.

सरकारकडून लादण्यात येत असलेली दरवाढ, दैनंदिन गरजेच्या वस्तूंसाठी मोजावी लागणारी अधिक रक्कम, अतिवृष्टी, पूर यामुळे पिकांचे झालेले नुकसान या साऱ्याचा परिणाम आता दरवाढीवरून दिसून येत असून सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला बसणारी झळ आता आणखीन तीव्र होत असल्याचे निदर्शनास येत आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.