Thursday, May 2, 2024

/

माध्यमिक शाळा मधील शिक्षकांच्या रिक्त जागा भरणार

 belgaum

सरकारी माध्यमिक शाळांमधील शिक्षकांच्या रिक्त जागा आणि यामुळे होणारे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान याबाबत शिक्षण विभागाने विचार केला असून तात्काळ 2500 माध्यमिक शालेय शिक्षकांच्या नेमणुका करण्याबाबत सरकार प्रयत्नशील आहे. सरकारी माध्यमिक शाळांमध्ये विद्यार्थी संख्या असून देखील शिक्षक संख्या कमी असल्याने कार्यरत शिक्षकांवर कामाचा बोजा वाढत आहे.

परिणामी अध्ययन अध्यापन प्रणाली राबविताना अडचणी येत आहेत. यामुळे रिक्त जागा भरणे गरजेचे असून याबाबत शिक्षण विभागाने प्रभावीपणे पाऊल उचलण्याचा विचार केला आहे.

माध्यमिक शालेय शिक्षकांच्या आणि पदवी पूर्व महाविद्यालयीन प्राध्यापकांचा रिक्त जागा भरण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.लवकरच 2500 शिक्षकांच्या नेमणूक प्रक्रियेला प्रारंभ होणार आहे यामुळे शिक्षक भरतीच्या प्रतीक्षेत असणाऱ्या पात्र उमेदवारांना दिलासा मिळाला आहे. राज्यात जिल्हा निहाय रिक्त असणाऱ्या माध्यमिक शिक्षकांच्या जागांवर सदर नियुक्ती करण्यात येणार असून यामुळे माध्यमिक शाळांमधील शिक्षण प्रणाली दर्जेदार होण्यास मदत होणार आहे.

 belgaum

सरकारी माध्यमिक शाळा मध्ये शिक्षकांची कमतरता असून ती कमतरता भरून काढण्यासाठी 2500 शिक्षकांची नेमणूक करण्यात येणार आहे. त्यामध्ये 2200 सहाय्यक शिक्षक, 200 क्रीडा शिक्षक आणि 100 विषय शिक्षक पदांचा समावेश आहे.

शिक्षक म्हणून कार्यरत असणारे शिक्षकच दोन-तीन विषय शिकवण्याचे कार्य करत असून पाचवी ते दहावी वर दोन-तीन विषय घेत असताना त्यांना कसरत करावी लागत आहे यामुळे 2200 या सहाय्यक शिक्षक पदांच्या रिक्त जागा भरल्यास नक्कीच शाळांचा शैक्षणिक दर्जा सुधारण्यास लाभ होणार आहे.

 belgaum

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.