गेल्या दोन वर्षांच्या काळात बेळगाव जिल्ह्यातील राजकारणातले दोन मोठे चेहरे काळाच्या पडद्याआड गेले आहेत दीड वर्षांपूर्वी माजी रेल्वे राज्य मंत्री सुरेश अंगडी यांचे निधन झाल्यानंतर मंगळवारी रात्री राज्याचे अन्न नागरी पुरवठा वन मंत्री उमेश कत्ती यांचे बंगळुरूत निधन झाले आहे.
जिल्ह्यातील मयत दोन्ही नेते उमेश कत्ती रिक्षा चालवत आहेत आणि सुरेश अंगडी रिक्षा चालवत आहेत हा त्यांचा जुना फोटो सोशल मीडियावर ‘तू पुढे मी मागे’ असे लिहीत व्हायरल झाला आहे.कत्ती अंगडी या दोन्ही नेत्यांत कोणकोणते साम्य होते याची चर्चा देखील या फोटोवर सुरू आहे. दोघेही माजी मुख्यमंत्री बी एस येडीयुराप्पा यांचे शिष्य होते अंगडी मृदू तर कत्ती हे सरळ स्पष्ट बोलणारे होते. बेळगावात 2010 साली झालेले विश्व कन्नड साहित्य संमेलनाचे आयोजन आणि सुवर्ण सौधचे निर्माण यात दोघांचा मोठा वाटा होता.याशिवाय दोन्ही नेत्यांचे मराठी लोकांशी चांगले संबंध होते.
मराठी लोकांच्या सहकार्या मुळेचं बेळगावात विश्व कन्नड संमेलन शक्य झाले असे वक्तव्य उमेश कत्ती यांनी त्यावेळी काढले होते. सहकार क्षेत्रात डी सी सी बँकेच्या माध्यमातून बेळगाव खानापूर तालुक्यातील मराठी नेत्यांशी त्यांनी चांगला संपर्क ठेवला होता.पूर्वी सरकार अल्पमतात असतेवेळी ते समितीच्या तत्कालीन आमदारा बरोबर वाटाघाटी करत असत. सरकार म्हणून अनेकदा तेच मध्यस्थीची भूमिका बजावत होते त्यामुळे समितीच्या माजी आमदारांशी त्यांचे चांगले संबंध होते.
संकेश्वर भागातील कुरणकर नलवडे आदी मराठा समाजातील घराण्याशी त्यांनी घरोब्याचे संबंध बनवले होते हुक्केरी तालुक्यात मराठी मते थोडी असली तरी त्यांनी जवळचे संबंध बनवले होते अनेक ठिकाणी नगरपालिका पंचायत अनेकांना मराठी लोकांना प्राधान्य दिले होते.संकेश्वर भागांत मराठी कन्नड दोन समाजात वितुष्टपणा जाणवू दिला नाही त्यामुळे हुक्केरी तालुक्यातील महाराष्ट्र सीमेवरील मराठी लोकांशी चांगले संबंध बनवले होते जुन्या काळातील बेळगावातील मराठी पत्रकारांना ते नेहमी सौजन्याची वागणूक देत होते त्यामुळे त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते.
उमेश कत्ती यांच्या रूपाने उत्तर कर्नाटकातील एक दमदार आणि दिलदार नेता काळाच्या पडद्याआड गेला आहे.सर्व भाषिक सर्व धर्मीय लोकांना सामावून घेणारा नेता अशी उमेश कत्ती यांची ओळख होती मुस्लिम धर्मीयांत देखील त्यांचा चांगला चाहता वर्ग होता.राजकारणातील होतकरू नवीन कार्यकर्त्यांसाठी कत्ती हे दीपस्तंभा सारखे होते.त्यांच्या माध्यमातून अनेकांनी राजकारणात प्रवेश केलेला आहे.
बेळगाव उत्तरचे आमदार अनिल बेनके याना राजकारणात मोठे सहकार्य केले होते डी सी सी बँकेच्या माध्यमातून बेळगाव शहर खानापूर तालुक्यातील मराठी नेत्यां सोबत चांगले संबंध होते.