Friday, May 24, 2024

/

किल्ला एंट्री गेट यासाठी झाले बंद-कारण आले समोर

 belgaum

किल्ला परिसरात बिबट्या सदृश्य प्राणी दिसला नाही जनतेने घाबरण्याची कोणतीही गरज नाही.काल किल्ला परिसरात दुचाकीवरून जाताना अपघातात एका व्यक्तीला हृदय विकाराचा झटका आला होता यासाठी किल्ला परिसर दुचाकी चार चाकी रहदारीसाठी बंद करण्यात आला आहे अशी माहिती सैन्यच्या अधिकाऱ्यांनी ए सी एफ मल्लिकार्जुन कुसनाळ यांना दिली आहे त्यामुळे किल्ला परिसरातील लोकांनी घाबरण्याचे कोणतेही कारण नाही आहे असे आवाहन करण्यात आले आहे.

किल्ल्याचे गेट बंद केल्याने बुधवारी पहाटे पासून किल्ला तलाव परिसरात बिबट्या सदृश्य प्राणी दिसला असल्याचीअफवा पसरली होती त्याला वन खात्याच्या अधिकाऱ्यांकडून स्पष्टीकरण मिळाले आहे.Fort

दुर्गादेवी मंदिर परिसरात काल गाडी चालवताना एका व्यक्तीला हार्ट अटॅक आला होता चार जण अपघातात जखमी झाले होते यासाठी सैन्य अधिकाऱ्यांनी रस्ता बंद केला आहे असेही कारण समोर आले आहे.

 belgaum

गेटवर सेवा बजावणाऱ्याना मॉर्निंग वाक करायला जाणाऱ्याना चुकीची माहिती दिल्याने बिबट्या सदृश्य प्राणी असल्याची माहिती पसरली असावी असेही समजले आहे. मॉर्निंग वार्कर्सच्या तोंडातून ही बातमी वाऱ्यासारखी पसरली होती मात्र आता वन खात्याने स्पष्ट केल्याने नेमके कारण समोर आले आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.