‘स्वर मल्हार फाऊंडेशन ‘बेळगांव तर्फे शनिवार दि.१०सप्टेंबर रोजी आद्रिजा बसू आणि एलिक सेनगुप्ता ,कोलकाता या दांपत्याच्या बहारदार गायनाची बैठक संपन्न झाली.
सुरवातीला अद्रीजा यांनी राग मुलतानी मध्ये’ गोकुल गाव का छोरा ‘ही विलंबित त्रिताल आणि त्यानंतर’ नैनन मे आन बान ‘ही द्रुत एकतालातील बंदिश सादर केली.
आपल्या गायनाची समाप्ती राग कामोद मधील दोन बंदिशी गाऊन केली.स्वच्छ, निकोप ,सुरेल आवाज आणि रागांची शिस्तपूर्ण मांडणी यामुळे त्यांनी रसिकांची दाद मिळविली.
त्यांना नारायण गणाचारी आणि सारंग कुलकर्णी यांनी तितकीच रंगतदार साथसंगत दिली. तानपुरा साथ तन्मयी सराफ हिने केली.
बैठकीचे दुसरे कलाकार होते अलिक सेन गुप्ता.
अलिक यांनी आपल्या मैफिलीची सुरुवात राग जोगकंस ने केली. ‘सुघर वर पाया’ -ही विलांबित एकतालातील आणि त्यानंतर ‘पिर पराई’ -ही दृत तीन तालातील बंदिश अतिशय तयारीने सादर केली. त्यानंतर राग गौड मल्हार मधे मध्यलय तीन तीन तालातील बंदिश आणि त्यानंतर एक तराना सादर केला. बैठकीचे समापन भैरवीतील ‘तुम हो जगत के दाता’ या भजनाने केली.
ग्वाल्हेर आणि आग्रा घराण्याची शिस्त बद्ध मांडणी, भारदस्त आणि तितकाच लवचिक आवाज यामुळे अलिक यांनी रसिकांना मंत्र मुग्ध केले.
त्यांना संतोष पुरी आणि सारंग कुलकर्णी यांची सुयोग्य साथसंगत लाभली.सुरवातीला अद्रीजा आणि अलिक यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार तसेच कलाकारांचा परिचय रोहिणी कुलकर्णी यांनी करून दिला.कार्यक्रमाला रसिकांची ही लक्षणीय उपस्थिती होती.