Monday, November 18, 2024

/

संस्कृती एज्युकेअरच्या ‘या’ कार्यशाळेची सांगता

 belgaum

बेळगाव शहरातील टिळकवाडी येथील संस्कृती एज्युकेअरतर्फे आयोजित ‘आनंदी मन’ (द हॅपी माईंड) या विषयावरील मानसिक आरोग्य विकास कार्यशाळेचा सांगता समारंभ नुकताच उत्साहात पार पडला.

संस्कृती एज्युकेअरतर्फे दुसऱ्यांदा आयोजित या कार्यशाळेद्वारे मानसिक अनारोग्य आणि नकारार्थी विचार यांच्यावर मात करण्यासाठी महिलांची आणखी एक तुकडी सज्ज झाली आहे. कार्यशाळेमध्ये 4 महिन्याचे प्रशिक्षण घेतलेल्या या महिलांना पूर्वीच्या आपण आणि आत्ताच्या आपण हा आपल्यातील बदल जाणवू लागला आहे.

कार्यशाळेच्या सांगता समारंभाप्रसंगी बोलताना संस्कृती एज्युकेअरचे प्रमुख समुपदेशक व शिक्षक तेजस कोळेकर म्हणाले की, प्रत्येकाने आपल्या आयुष्यात मानसिक आघात सहन केलेला असतो पण त्याचा उल्लेख करण्यास लोक कचरतात. जे घडतंय त्याला आपण काही करू शकत नाही असे जेंव्हा वाटते त्यावेळी आपले मन अस्थिर होण्यास सुरुवात झालेले असते.

कालांतराने ती व्यक्ती स्वतःला कमी समजू लागते आणि मानसिक दृष्ट्या पूर्णतः कोलमडते. आपल्याला मदत हवी असते, प्रत्येकालाच मदत हवी असते आणि ती जर वेळेवर मिळाली तर त्यामुळे अनेक प्रकारच्या मानसिक आजारांवर मात करण्याबरोबरच नातेसंबंध व जीव जपता येऊ शकतो.SAnskruti educare

संस्कृती एज्युकेअरच्या कार्यशाळेचा लाभ घेतलेल्या महिला आता आपला आत्मसन्मान आणि आत्मविश्वास परत मिळवून पुन्हा आपल्या कुटुंबासमवेत आनंदी व सुखी आयुष्य व्यतीत करण्यास सिद्ध झाल्या आहेत. आज आपल्याला अशा कार्यशाळांसारख्या कार्यक्रमाची तसेच तंदुरुस्त मानसिक आरोग्याच्या जनजागृतीची अत्यंत गरज आहे. याची वेळीच काळजी घेतली नाही तर आपल्याला वाईट परिणामांना सामोरे जावे लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.

संस्कृती एज्युकेअरने मानसिक आरोग्यासंदर्भातील जनजागृतीची प्रक्रिया फार पूर्वी सुरू केली असून त्या अनुषंगाने समाजासाठी कार्यशाळांसारखे उपक्रम ही संस्था राबवत असते. आपणही या उपक्रमांचा भाग व्हा आणि बदल जाणून घ्या.

आपण एखाद्याला मदत केल्यास किंवा चांगल्या गोष्टीसाठी प्रोत्साहन दिल्यास लोकांचे जीवन बदलू शकते आणि हीच खरी मानवता आहे असेही संस्कृती एज्युकेअरचे प्रमुख तेजस कोळेकर यांनी स्पष्ट केले.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.