रोटरी क्लब ऑफ मिडटाऊन तर्फे नवरात्र उत्सवानिमित्त आयोजित विविध कार्यक्रमांचा परिपूर्ण खजिना आज दि.26 पासून खुला होणार होत आहे.
सदर दांडिया गरबा फेस्ट चा उद्घाटन समारंभ सायंकाळी 7 वाजता आमदार अनिल बेनके व रोटरी मिडटाऊन चे जिल्हा गव्हर्नर व्यंकटेश ( बबन) देशपांडे यांच्या उपस्थितीत पार पडणार आहे.दांडिया गरबा फेस्ट बरोबरच विविध स्पर्धा मनोरंजन तसेच खाद्यपदार्थांची रेलचेल अशा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे
दांडिया – गरबा फेस्ट 2022 दिनांक 26 सप्टेंबर ते 4 ऑक्टोंबर दरम्यान मराठा मंदिर गोवावेस येथील संत तुकाराम महाराज सांस्कृतिक सभागृह ओरिएंटल स्कूल येथे दुपारी 2 ते 10 यावेळेत पार पडणार आहे.
आज दुपारी दोन वाजता वक्तृत्व म्हणजेच भाषण स्पर्धा पार पडणार आहे. तर सायंकाळी सात वाजता उद्घाटन सोहळा होणार आहे.
सदर सोहळ्याला मान्यवरांच्या उपस्थिती बरोबरच रोटरी मिडटावून चे अध्यक्ष विजय पुजारी, सेक्रेटरी आनंद गुमास्ते, इव्हेंट प्रमूख निता बिडीकर, माजी अध्यक्ष सतिश मिठारे तसेच अशोक मळगली,सतिश नाईक, गुलाबचंद चौगुले रोटरी मिड टाऊनचे सदस्य तसेच संचालक उपस्थित राहणार आहेत.