परतीच्या पावसाने बेळगांव जिल्ह्याला झोडपून काढल्याने शेतकरी पुरता हवालदिल झाला होता. मात्र आठवड्याभानंतर पावसाने चांगलीच उसंत घेतली असून शेतकरी वर्गाला दिलासा मिळाला आहे. कडक ऊन पडत असून यामुळे काढणीला आलेल्या पिकांसाठी हे वातावरण योग्य ठरले आहे.बटाटा तसेच भुईमूग काढण्याची लगबग शेतांमधून सुरू असून होणार असून पाऊस थांबल्याने हे वातावरण काढणीच्या कामासाठी पोषक ठरणार आहे.
आठवड्याभरात परतीच्या पावसाने चांगलेच झोडपून काढल्याने सर्वत्र पाणीच पाणी आणि शेतात देखील जणू तलावच निर्माण झाले होते परिणामी शेतात जाणे देखील शेतकऱ्यांसाठी कठीण बनले होते.
यामुळे काढणीला आलेला भाजीपाला देखील शेतातच कुसून गेला होता.परिणामीभातासाठी लाभदायक ठरलेला हा पाऊस इतर पिकांसाठी मात्र उपयुक्त ठरला नाही. परिणामी शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले.
गणपती विसर्जननंतर सुरू झालेला परतीचा पाऊस आठवडाभर पडत होता.यामुळे भाताचे पीक सततच्या पाण्यामुळे गारठून जाईल अशी भीती व्यक्त होत होती.
परिणामी शेतकरी चिंतातुर झाला होता मात्र आता पावसाने उसंत घेतल्याने विविध पिके काढण्याच्या कामाला जोर आला आहे. कधीतरी हलक्या सरी येत आहेत.मात्र दिवसभर कडक ऊन असल्याने शेतीच्या इतर कामांसाठीची लगबग सुरू आहे.