राज्य पोलीस खात्यात रिक्त असलेल्या सशस्त्र पोलीस कॉन्स्टेबल पदासाठी भरतीची अधिसूचना जारी करण्यात आली असून येत्या 19 सप्टेंबर ते 31 ऑक्टोबर या कालावधीत अर्ज दाखल करून घेतले जाणार आहेत. विशेष म्हणजे तृतीयपंथीय उमेदवारांसाठी 68 जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत.
सशस्त्र पोलीस कॉन्स्टेबल पदाच्या भरतीसाठी जारी केलेल्या अधिसूचनेनुसार येत्या 19 सप्टेंबर रोजी सकाळी 10 पासून अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होणार असून 31 ऑक्टोबर (सायं. 6 वाजेपर्यंत) ही अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख आहे. सामान्य प्रवर्ग 2 (ए), 2 (बी), 3 (ए), 3 बी उमेदवारांसाठी 400 तर अनुसूचित जाती व जमातीसाठी 200 रुपये शुल्क ऑनलाईनद्वारे चलन डाऊनलोड करून कॅनरा बँक किंवा पोस्ट कार्यालयात भरावयाचे आहे.
संकेतस्थळावर देण्यात आलेल्या सूचनांचे वाचन करून काळजीपूर्वक अर्ज भरावा. अर्ज दाखल करण्यापूर्वी अर्जदाराने पांढऱ्या कागदावर पासपोर्ट आकाराचा रंगीत फोटो, सही आणि कोणतेही ओळखपत्र जोडावयाचे आहे. प्रत्येकाची सॉफ्ट कॉपी किमान 250 केबी स्कॅन करायची आहे. त्यानंतर अर्जदाराचे नांव, जात, जन्मतारीख आदी सर्व माहिती स्कॅन करून ती कॉम्प्युटरमध्ये अपलोड करावी पोलीस खात्याच्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊनच अर्ज भरावेत 19 सप्टेंबर ते 31 ऑक्टोबरपर्यंत अर्ज दाखल करावे लागणार आहेत.
सशस्त्र पोलीस कॉन्स्टेबल सामान्य पुरुष (सीएआर, डीएआर) पदासाठी 2996 जागा आहेत, तर तृतीयपंथीयांसाठी (सीएआर, डीएआर) 68 जागा आरक्षित आहेत. त्या पद्धतीने एकूण 3,064 जागांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे.
भरतीवेळी पुरुष आणि तृतीयपंथी उमेदवारासाठी कमीत कमी वय 18 वर्षे अनुसूचित जाती-जमाती प्रवर्गासाठी 27 वर्षे इतर उमेदवारांसाठी 25 वर्षे तर वन्य प्रदेशातील उमेदवारासाठी तीस वर्षाची मर्यादा आहे माजी सैनिक देखील भरतीमध्ये भाग घेऊ शकतात. यासाठी इच्छुकांनी
https://ksp.karnataka.gov.in किंवा https://ksp.recruitment.in/ या संकेतस्थळाला भेट देऊन ऑनलाईनद्वारे अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.