Friday, May 24, 2024

/

वन मंत्री उमेश कत्ती यांचे निधन-बुधवारी शाळा कॉलेजना सुट्टी

 belgaum

कर्नाटकचे अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक व्यवहार आणि वन मंत्री उमेश कत्ती यांचे मंगळवारी रात्री हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. उमेश कत्ती यांना हृदयविकाराचा झटका येण्याची हि पहिलीच वेळ नसून तिसरी वेळ हा झटका आला आहे.

मंगळवारी संध्याकाळी बेंगळुरू येथील डॉलर्स कॉलनी येथील निवासस्थानी त्यांना हृदयविकाराचा झटका आल्यानंतर एम एस रामय्या हॉस्पिटलमध्ये त्यांना दाखल करण्यात आले होते. मात्र यादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. निधानसमयी ६१ वर्षांचे असलेले उमेश कत्ती यांनी अखंड कर्नाटकाची स्वप्ने पाहत मुख्यमंत्रीपदी जाण्याचीही इच्छा व्यक्त केली होती.

हुक्केरी विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत असताना त्यांनी बेळगावच्या विकासासाठी जिल्ह्याच्या त्रिभाजनाचा मुद्दा उचलून धरला होता. भाजपचे प्रबळ दावेदार असलेले उमेश कत्ती यांना यमकनमर्डी मतदार संघात उमेदवारी देण्यासंदर्भात देखील भाजपने तीव्र हालचाली सुरु केल्या होत्या.

 belgaum

यमकनमर्डी मतदार संघात काँग्रेसला मात देण्याच्या तयारीत असलेल्या भाजपने उमेश कत्ती यांच्यासारखा ज्येष्ठ राजकारणी गमावला आहे. त्यांच्या निधनानंतर मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी ट्विट करत राज्याने एक मुत्सद्दी राजकारणी गमावल्याचे म्हटले आहे.

बुधवारी सकाळी 8 वाजता त्यांचे पार्थिव विशेष विमानातून बेळगावमध्ये आणले जाणार आहे.

बुधवारी सुट्टी

मंत्री उमेश कत्ती यांच्या निधनाने बेळगाव जिल्ह्यातील सर्व शाळा कॉलेजला,शासकीय कार्यालयाना बुधवारी सुट्टी देण्यात आलेली आहे त्यांचे पार्थिव बेंगलोर होऊन  विशेष विमानाने सकाळी 8 वाजता दरम्यान बेळगाव विमानतळ येणार असून बेळगाव नंतर ते हुक्केरी येथील हिरा शुगर्स येथे अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे त्यानंतर त्यांच्यावर  सायंकाळी 5 वाजता बेल्लद बागेवाडी येथे अंतिम संस्कार केले जाणार आहेत.

 

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.