बिबट्या गेला म्हणून शोधासाठी आलेल्या हत्तींना परत पाठवण्यात आलेले असताना आता पुन्हा एकदा बेळगावच्या किल्ला परिसरात बिबट्या सदृश्य प्राण्याचे दर्शन घडले असण्याची शक्यता आहे. त्यामुळे किल्ल्यातील प्रवेश बंद ठेवण्यात आला आहे. किल्ला परिसरात दोन्ही बाजूची प्रवेशद्वारे बंद ठेवून मॉर्निंग वॉकर्सनाही निर्बंध घालण्यात आले असून कोणीही किल्ला परिसरात फिरू नये याची खबरदारी घेण्यात आली आहे.
बुधवारी सकाळी मॉर्निंग वाक साठी गेलेल्याना सैन्याच्या अधिकाऱ्यांनी परत पाठवले असून बुधवारचा दिवस किल्ल्यात नो मूव्हमेंट असणार असल्याचे सांगितले जात होते.
किल्ला परिसरात बिबट्या सदृश्य प्राणी दिसल्याचे समजताच आवश्यकती खबरदारी घेण्यात आल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. सुरुवातीला गोल्फ कोर्स त्यानंतर मंडोळी बाकनुर या परिसरात दिसलेल्या बिबट्याने आता किल्ला भागातही धास्तीचे वातावरण तयार केले आहे.
ज्या ज्या ठिकाणी वृक्ष आणि वनराई आहे अशा भागात जंगली प्राण्यांचे वास्तव्य आणि संचार दिसून येऊ लागला असून बेळगाव शहरावर एक सर्वात मोठे संकट निर्माण झाल्याची परिस्थिती आहे .त्या पार्श्वभूमीवर सध्या किल्ला परिसरातील प्रवेशद्वारे बंद करून खबरदारी घेण्यात येत आली आहे.
गोल्फ परिसरावर नजर ठेवल्यानंतर बिबट्या आपल्या अधिवासात गेला असल्याचा अंदाज घेऊन वनविभागाने शोधासाठी आणलेल्या हत्तींना पुन्हा परत पाठवल्यानंतर ही परिस्थिती निर्माण झाल्यामुळे प्रशासनाचा आता आणखी एकदा कस लागणार आहे.