मठाच्या वस्तीगृहातील विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण केल्याच्या आरोपावरून चित्रदुर्ग येथील मुरुघ मठाचे डॉ. शिवमुर्ती स्वामीजी यांना चित्रदुर्ग पोलिसांनी अखेर पोक्सो कायद्या अंतर्गत अटक केली आहे.
मुरुगमठाच्या वस्तीगृहातील दोन मुलींचे लैंगिक शोषण -अत्याचार केल्याप्रकरणी डॉ. शिवमुर्ती स्वामी अलीकडे चर्चेत आले होते. त्यानंतर अटक होण्याची शक्यता निर्माण होताच स्वामीजी व अन्य चार जणांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता.
राष्ट्रीय बालहक्क संरक्षण आयोगाने मुलींच्या लैंगिक शोषण प्रकरणाची स्वतःहून दखल घेत स्वामीजींच्या विरोधात तक्रार दाखल करून घेतली आहे. स्वामीजी व अन्य चार जणांच्या अटकपूर्व जामीन अर्जावरील सुनावणी आज शुक्रवारी होणार होती.
आता एफआयआर दाखल झाल्यानंतर सात दिवसांनी स्वामीजींना अटक झाली आहे. लैंगिक शोषण प्रकरणी डॉ. शिवमुर्ती स्वामीजी विरोधात पोक्सो कायद्यांतर्गत आणि ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
काल गुरुवारी रात्री चित्रदुर्ग ग्रामीण पोलीस ठाण्याचे निरीक्षक भालचंद्र नाईक आणि मूळकालमुरू पोलीस ठाण्याचे निरीक्षक सतीश यांनी मठात जाऊन डॉ. शिवमुर्ती यांना अटक केली. त्यानंतर स्वामीजींना अज्ञात स्थळी नेण्यात आले.