समाजात घडलेल्या घटना आणि प्रसंग यांचे चित्र देखाव्याच्या माध्यमातून सादर करत गणेशोत्सव काळात सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे जागृती करत असतात.
सध्या बेळगाव मध्ये सुरू असलेला बिबट्याचा विषय हा मंडळांनी वैविधपूर्णरित्या प्रभावीपणे मांडला आहे. मंडळातील बोलके फलक हे देखील जागृतीचे महत्त्वपूर्ण कार्य बजावतात. माळी गल्ली येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने देखील आपली सामाजिक बांधिलकी जपत बिबट्या शोध मोहीम या घटनेचा फलक उभारला आहे.
बिबट्या लवकरात लवकर सापडू दे अशी गणराया चरणी प्रार्थना करत फलकाचे अनावरण करण्यात आले.शिवाय त्या ठिकाणी जंगल आणि जंगलातले प्राणी असा देखावा देखील साकारण्यात आला आहे.सदर जंगलामध्ये उंदीर ससा जंगली कोंबडा असे प्राणी ठेवण्यात आले असून आमच्या जंगलातील प्राण्यांना हात लावला तर तेही चावतील. मला माझ्या घरी पोहोचवा असे बिबट्या बोलतो आहे असा संदेश देखील त्या ठिकाणी देण्यात आला आहे.
असेच बोलता बोलता म्हणून विनोदी वाक्य देखील त्या फलकावर नोंदविण्यात आली आहेत. कधी पकडणार बिबट्याला आणि बिबट्याच्या आगमनामुळे झालेले विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान असे चारही बाजूने बेळगावात दाखल झालेल्या बिबट्या बाबत ची माहिती फलकावर नोंदविण्यात आली आहे.
दरवर्षी माळी गल्ली येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने वैविध्यपूर्ण विषय मांडत आपली जबाबदारी पार पाडली असून यावर्षी देखील या विषयावर प्रकाश टाकला आहे यामुळे गणपती बघायला आलेल्या भाविकांकडून देखाव्याला पसंती दर्शवली जात आहे.
नगरसेविका ज्योती कडोलकर माजी उपमहापौर रेणू किल्लेकर यांच्या हस्ते या देखाव्याचे उदघाटन करण्यात आले.यावेळी बेळगाव live चे संपादक प्रकाश बेळगोजी दीपक पावशे यांचा सत्कार करण्यात आला.मंडळाचे अध्यक्ष मेघन लंगरकांडे यांनी स्वागत केले