महाराष्ट्र सरकार प्रमाणे कर्नाटक सरकारने देखील लंपी स्किन रोगामुळे बैल, दुभती जनावरे दगावलेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी जोरदार मागणी केली जात आहे.
देशात थैमान घातलेल्या लंपी स्किन रोगाने शेतकरी तसेच जनावरं पाळणाऱ्याची जनावरं बगावत आहेत त्यामुळे संबंधितांचे मोठे नुकसान होत आहे. लंपी स्कीनमुळे जनावरे गमावलेल्यांना उभारी देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने दुभती जनावरं, बैल, लहान जनावरं यांची वर्गवारी करुन नुकसानभरपाई देण्याचे जाहिर केले आहे.
त्याप्रमाणे कर्नाटक सरकारनेही लंपी स्किन रोगाने दगावलेल्या जनावरांची नुकसानभरपाई देऊन शेतकरी व गवळी समाजाला उभारी द्यावी, अशी मागणी केली जात आहे. बेळगाव तालुक्यातील आठवडा भरात तीन हुन अधिक शर्यतींचे बैल दगावले आहेत याची दखल प्रशासनाने घ्यावी अशीही मागणी आहे.
बेळगाव तालुक्यातील पूर्व भागात मुतगा निलजी कणबर्गी आदी परिसरात गेल्या काही दिवसांत 15 हून अधिक जनावरे लंपी स्किन रोगाने दगावली आहेत बेळगाव तालुक्यातील या रोगाने अनेक बैल गायी त्रस्त आहेत अश्या परिस्थितीत शासनाने मदत द्यावी अशी मागणी वाढत आहे.
चित्त्याचे फोटो सेशन झाले असेल तर लंपी स्किन च्या विळख्यात अडकलेल्या गोवंशाची रक्षा करा गायी बैलांना वाचवा अशी बोचरी टीका करणारे संदेश देखील सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत.